Big Breaking News कोराडी विद्युत केंद्रातील 210 मेगावॉट प्रकल्पातील असिस्टंट इंजिनिअर चे पती निघाले कोरोना पाँजिटीव कोरोना संसर्गात उगाच शक्तीमान बनुन विनाकारण फिरणे टाळा

0
2305

 

सुनील उत्तमराव साळवे
(९६३७६६१३७८)
कार्यकारी संपादक, दखल न्यूज भारत नागपुर

कोराडी / नागपुर: १९ जुलै २०२०
सध्या कोरोना ने सर्वत्र थैमान घातले असुन त्याचा फटका नागपूर च्या कोरोंटाईन सेंटर मध्ये कार्यरत प्राध्यापकांना बसला आहे. त्यामुळे आता सर्व अधिकारी, कर्मचारी आणि नागरिकांना कोरोना संकटाला गांभीर्याने घेण्याची गरज आहे. गरज नसताना ही घराबाहेर पडु नये तसेच आवश्यक असल्यासच घराबाहेर मास्क लावून च बाहेर पडावे. कारण नागपुर शहरातील कोरोना चा शिरकाव आता ग्रामीण भागात ही झाला आहे.
त्यामुळे महाजेनको प्रशासनात कार्यरत अधिकारी, कर्मचारी किंवा त्यांच्या परिवारातील सदस्यांनी उगीच स्पाइडरमैन, शक्तीमान बनुन बाहेर पडु नये.
विद्युत विहार कोराडी काँलनी काँलनी तील New E Type – 01 मध्ये राहणाऱ्या तसेच कोराडी वीज प्रकल्पा (जुने 210 मेगावॉट) तील बाँयलर मेंटेनन्स मध्ये कार्यरत महिला अधिकारी Assistant Engineer यांचे पती वय(33वर्ष)हे शासकीय तंत्रनिकेतन काँलेज ( Gove . Polytecnic, सदर नागपूर) येथे प्राध्यापक आहेत. Manpower ची कमी आहे शासनाकडे. शासनाने या युवा प्राध्यापकांची पाचपावली कोरोंटाईन सेंटर मध्ये ड्युटी लावली होती. मागील 2 महिन्यापासून ते कर्तव्यावर ड्युटी बजावत असतांना त्यांना कोरोना चा संसर्ग झाला काल त्यांची टेस्ट केली असता आज आता एक तासापूर्वी ते कोरोना पाँजिटीव असल्याचा रिपोर्ट आला. त्यामुळे गुमथी प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉ. राहुल राऊत, महाजेनको प्रशासनाचे मुख्य अभियंता राजकुमार तासकर, तसेच सुरक्षा अधिकारी, कर्मचारी हे या भागात पोहोचुन घटनेची माहिती घेतली तसेच कोरोना पाँजिटीव पेशंट प्राध्यापक, त्यांची पत्नी त्यांची 2 मुले यांना IGMC ला उपचारार्थ अंबुलंस ने पाठवले.
सुरक्षिततेच्या दृष्टीने NEW E-01 Type बिल्डिंग ला सेनिट्राईज करण्यात आले असुन या बिल्डिंग मधील अधिकारी व त्यांच्या परिवारास होम कोरोंटाईन करुन कंटोनमेंट Zhone प्रतिबंधित क्षेत्र महाजेनको प्रशासनाने घोषित केले आहे. तरी या परिसरातील लोकांना बाहेर पडण्यास आणि बाहेरुन येणाऱ्यांना मनाई आहे.
या संदर्भात मुख्य अभियंता राजकुमार तासकर हे आपल्या अधिकारी यांचेशी बैठक करुन सुरक्षा व्यवस्था संदर्भात उचित उपाययोजना करीत आहेत असे सुत्रांनी सांगितले आहे.