Home अकोला मुंडगाव येथे कोरोना योद्धाना मास्क वाटप

मुंडगाव येथे कोरोना योद्धाना मास्क वाटप

144

 

अकोट शहर प्रतिनिधी स्वप्निल सरकटे

कोरोना ( कोविड 19) ने आपले पाय पसरून शहरासह ग्रामीण भागात पोहोचला. या मुळे जनतेमध्ये भीती युक्त वातावरण झाले आहे या संकट काळात विविध विभागासह आरोग्य विभाग हे आपले योगदान देत कोरोनाग्रस्त रुग्ण व त्या परिसरात भेटी देऊन आपले कर्तव्य बजावीत आहेत.त्यांची ही सेवा बघून दूरदृष्टी असणारे भाजपा नेते केंद्रिय राज्यमंत्री संजय धोत्रे यांनी पुढाकार घेऊन कोरोना योद्धांना उच्च प्रतीचे एन 95 चे मास्क उपलब्ध करून दिले.दि . 18 जुलै ला आकोट ग्रामीण मुंडगाव प्राथमिक आरोग्य केंद्र येथे भाजपा जिल्हा अध्यक्ष आमदार रणधीर सावरकर, आमदार प्रकाश भारसाकळे,तालुका अध्यक्ष अशोकराव गावंडे,राजुभाऊ नागमते यांच्या नेतृत्वाखाली face mask वाटण्यात आले.यावेळी माजी तालुका सरचिटणीस सुनील गिरी,मानिक गावंडे,दिपक मुंडोकार, यांनी मास्क चे वितरण केले.या प्रसंगी वैधकीय अधिकारी शारदा भिरडे, डाॅ. शारदा कोडे व कर्मचारी एस. के. तडोकार,आर. बी. नागरे, एस एस टवले,एस एस वागतकार, सि. ड. अंबडकार ,एस ए. छापरवाले श्रीमती घुगरे, मिलींद सरकटे आदीयावेळी उपस्थित होते.

Previous articleसंत गाडगेबाबा विचार मंच बहुउद्देशीय संस्था तर्फे मा श्री साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे याच्या स्मृती दिनानिमित्त आयोजित भव्य वृक्षारोपण सोहळा
Next articleBig Breaking News कोराडी विद्युत केंद्रातील 210 मेगावॉट प्रकल्पातील असिस्टंट इंजिनिअर चे पती निघाले कोरोना पाँजिटीव कोरोना संसर्गात उगाच शक्तीमान बनुन विनाकारण फिरणे टाळा