वणी बस-स्थानक बनला मद्यपिंचा अड्डा! ,लक्ष देण्याची प्रवाशांची मागणी

564

 

वणी : परशुराम पोटे

कोरोनाच्या पार्श्वभुमिवर सद्या सर्वत्र लाकडाऊन असल्यामुळे शहरात सायंकाळच्या सुमारास नागरीकांची रेलचेल मंदावली असुन सुनसुनाट दिसुन येत आहे. याचा परिणाम महाराष्ट् राज्य परिवहन विभागावरही पडला आहे. परिणामी वणी बस-स्थानकावर जनु स्मशान शांतता पसरली असुन याठिकाणी मद्यपिंनी आपला अड्डा बनविला की,काय? असे चित्र दिसुन येत आहे.
आज दि.19 जुलैला सकाळी 10 वाजता नेहमी प्रमाणे आजही काही पत्रकार मंडळी वणी बसस्थानकावर गेले असता त्यांना बस स्थानकाच्या प्लेटफार्मवर बियर च्या बाटल्या आढळुन आल्या,यावेळी बसस्थानक परिसरात फेरफटका मारला असता तळीराम ‘झिंगाट’ होऊन बसस्थानकाचा आधार घेवुन असल्याचे आढळले.या तळीरामांचा उपस्थित प्रवाशांना त्रास सहन करावा लागत असल्याचेही आढळुन आले. याप्रकाराकडे बसस्थानक प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी प्रवाशांमधुन होत आहे.