१ कोटी २८ लाख ७८ हजाराचा अवैध रासायनिक जैविक खताचा साठा जप्त

120

 

बिंबिसार शहारे(९५४५७७६३७८)
वि.जिल्हा प्रतिनिधी दखल न्युज

गोंदिया,दि.१९/०७/२०२०:
गोंदिया-कोहमारा राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या मिलटोली येथील सीतापेठी राईस मिल तुमखेड्याच्या गोदामात अवैधरित्या रासायनिक खताचा साठा असल्याच्या मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे केलेल्या कारवाईत १ कोटी २८ लाख ७८ हजार ७९६ रुपयाचा रासायनिक व जैविक खताचा मुद्देमाल जप्त करुन गोंदाम सिल करण्याची कारवाई पोलिसांनी कृषी विभागाच्या सहकार्याने केली आहे. १८ जुर्ले रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलिस निरिक्षक रमेश गर्जे,जिल्हा गुण नियंत्रण निरिक्षक बाळासाहेब गिरी,जिल्हा कृषी अधिकारी मनोहर मुंढे यांच्या पथकाने गोदामावर धाड टाकून तपासणी केली असता गोदामात विदर्भ को-ऑपरेटिव्ह मार्केqटग फेडरेशन लिमी.यांच्या सितापेठी राईसमिल येथे असलेल्या गोदामाची तापसणी केली असता ६४६५.२० क्विटंल रासायनिक खत १ कोटी ९ लाख २९ हजार ९९६ रुपये व ५०३० लिटर जैविक खत किमंत १९ लाख ४८ हजार ८०० रुपये असा १ कोटी २८ लाख ७८ हजार ७९६ रुपयाचा खताचा साठा आढळून आला.तपासणी दरम्यान विदर्भ को ऑपरेटिव्हच्या खते विक्री परवान्याच्या तपासणीत सदर गोदामाला परवाना नसल्याचे दिसून आले. गोदामाचे ठिकाण परवान्यात समाविष्ठ नसताना रासायनिक खताचा साठा केल्याने गोदाम सिल करुन २० जुर्लेपर्यंत विक्रीबंद आदेश देत विदर्भ को ऑपरेटिव्ह मार्केqटग फेडरेशनला खुलासा सादर करण्याची मुदत देण्यात आली आहे.ही कारवाई पोलिस अधिक्षक मंगेश शिंदे,अप्पर पोलिस अधिक्षक अतुल कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी व कर्मचारी तसेच कृषी विभागाच्या पथकाने केली.