जिल्ह्यातील ओबीसीचे आरक्षण पूर्ववत 19 टक्के करा परिवर्तन पॅनल यांची मदत व पूनर्वसन ,बहूजन विकास मंत्री वडेट्टीवार यांच्या कडे मागणी

 

ऋषी सहारे
कार्यकारी संपादक

आरमोरी दि19जुलै गडचिरोली जिल्ह्यातील कमी झालेले ओबीसी प्रवर्गातील आरक्षण हे तात्काळ पूर्ववत 19 टक्के करण्यात यावे या मागणीसाठी आरमोरी येथील परिवर्तन पॅनल तर्फे आज दिनांक 18 जुलै रोजी राज्याचे मदत पुनर्वसन व बहुजन विकास मंत्री नामदार विजय वडेट्टीवार ,पालकमंत्री गडचिरोली जिल्हा यांना दिलेल्या निवेदनात केली आहे. परिवर्तन पॅनल च्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की गडचिरोली जिल्ह्यातील ओबीसी प्रवर्गातील नागरिकांची लोकसंख्या 42 टक्क्याहून अधिक असताना त्यांना केवळ सहा टक्के आरक्षण देणे हा त्या प्रवर्गातील नागरिकांवर अन्याय आहे त्यामुळे ओबीसीचे आरक्षण पूर्ववत 19% करून त्यांना न्याय देण्यात यावा तसेच केवळ राजकीय हितसंबंध पोटी मागील अनेक वर्षापासून गडचिरोली जिल्ह्यातील ओबीसी नागरिकावर सतत राज्य शासनाकडून तसेच केंद्र शासनाकडून अन्याय होत आहे त्यात ओबीसींना 19 टक्के आरक्षण लागू केले होते मात्र राज्य शासनाने दोन वेळा आदेश जारी करून गडचिरोली जिल्ह्यातील आरक्षण सहा टक्क्यांपर्यंत घटविले 1997 मध्ये पहिल्या आदेशान्वये ते 19 टक्के वरून 11 टक्के वर आणले त्यानंतर दुसऱ्या आदेश काढून 11 टक्के वर करून ते सहा टक्क्यांवर आणण्यात आले त्यामुळे गडचिरोली जिल्ह्यातील ओबीसींवर मोठा अन्याय झालेल्या असून ओबीसी बेरोजगारांना नोकऱ्या मध्ये नगण्य स्थान उरलेले आहे या उलट जिल्ह्यात अनुसूचित जमातीला 8 टक्क्यांवरून 24 टक्के आरक्षण वाढवून देण्यात आलेले आहेत त्यामुळे ओबीसी समाजातील नागरिकांनी तसेच बेरोजगार युवक युवकांमध्ये शासनाविरुद्ध अनेकदा आंदोलने मोर्चे काढून सुद्धा काही फायदा झालेला नाही गडचिरोली जिल्ह्यामध्ये पेसा कायदा लागू झाल्याने जिल्ह्यातील नोकर भरती मध्ये सुद्धा ओबीसी समाजातील युवकांना जागा मिळत नाही त्यामुळे ओबीसी समाजातील युवक अन्याय्य होऊन बेरोजगारीच्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे त्यामुळे शासनाविरुद्ध ओबीसी समाजाची नाराजी जाहीर होत आहे. आपण एक ओबीसी समाजातील मंत्री म्हणून राज्यात प्रसिद्ध आहात तसेच गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री या नात्याने आणि या गडचिरोली जिल्ह्यातील मूळचे आपण रहिवासी असून गडचिरोली जिल्ह्यामधील परिस्थिती आपणाला इतंभूत माहिती असून आहे त्यामुळे आपणाकडून जिल्ह्यातील ओबीसीचे आरक्षण पूर्ववत 19% करण्यासाठी आपण स्वतः शासनाकडे पाठपुरावा करून कमी झालेले ओबीसी समाजाचे आरक्षण पूर्ववत 19% कर करावे अशी गडचिरोली जिल्ह्यातील ओबीसी नागरिकांची आपल्या कडून खूप अपेक्षा आहे आणि या मागणीसाठी आम्हाला ओबीसींना आपल्याकडून नक्कीच न्याय मिळेल याबाबतचे पत्र आरमोरी येथील परिवर्तन पॅनल च्या वतीने माननीय नामदार विजय वडेट्टीवार यांना देण्यात आले यावेळी निवेदन देताना परिवर्तन पॅनलचे अध्यक्ष चंदू दीपक बेहरे आरमोरी ,नगर परिषदेचे बांधकाम सभापती सागर मने, परिवर्तन पॅनलचे युवानेते भूषण सातव,नगर सेवक माणिक भोयर ,तानाजी कुथे, राजू ढोरे, पुंजीराम मेश्राम ,योगेश देवीकर , शैलेश चीटमलवार ,अक्षय चाचरकार, जयंत दहिकार कुणाल भरणे,भूषण किरमे आदी पदाधिकारी उपस्थित होते.