Home कोरोना  कोराडी काँलनी वसाहतीत पुन्हा एक २७ वर्षिय तरुणी निघाली कोरोना पाँजिटीव ...

कोराडी काँलनी वसाहतीत पुन्हा एक २७ वर्षिय तरुणी निघाली कोरोना पाँजिटीव चंद्रपूर ला गेलेले POG सेक्शन चे Executive Engineer पाँजिटीव कि निगेटिव्ह ? टेस्ट रिपोर्ट नसुन ही पाँजिटीव डिक्लेअर

5305

 

सुनील उत्तमराव साळवे(९६३७६६१३७८)
कार्यकारी संपादक, दखल न्यूज भारत नागपुर

कोराडी / नागपुर :१९ जुलै २०२०
नागपुर जिल्ह्यातील कोराडी औष्णिक वीज निर्मिती केंद्राच्या विद्युत विहार कोराडी काँलनी वसाहती तील E Type 110 या बिल्डिंग मध्ये राहणारी एक २७ वर्षिय तरुणी कोरोना पाँजिटीव निघाल्याची धक्कादायक बातमी समोर येत आहे.
कोराडी नवीन पावर प्लांट ३ × ६६० मेगावॉट प्रकल्पातील O S सेक्शन मध्ये डाटा एंट्री आँपरेटर म्हणुन कार्यरत ही २७ वर्षिय मुलगी महाजेनको प्रशासनाला न कळवता फावल्या वेळात कामठी येथील लाईफलाईन हाँस्पिटल ला नर्स म्हणून काम करीत होती असे म्हणतात. यासंदर्भात माहिती घेतली असता महाजेनको प्रशासनाने या मुलीने अतिरिक्त वेळेत इतर ठिकाणी काम करुन महाजेनको परिसरात कोरोना चा संसर्ग पसरविला असल्याचे सांगितले. ही मुलगी स्वामी विवेकानंद हॉस्पिटल कोराडी येथे पुर्वी कामाला होती.
महाजेनको प्रशासनाला जेव्हा या मुलींबद्दल माहिती मिळाली असता महाजेनको आता खळबळून गेले असुन सदर मुलीच्या निष्काळजीपणा व महाजेनको प्रशासनाला न कळविता परस्पर कामठी च्या लाईफलाईन हाँस्पिटल मध्ये नर्स म्हणून काम केल्यामुळे व कोरोना संकट कोराडी काँलनी वसाहतीत व नविन प्रोजेक्ट O S सेक्शनवर आणल्याने महाजेनको प्रशासन या तरुणीवर कोणती कारवाई करणार? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

कोरोनाबाधित ही मुलगी ४-५ दिवसापासून ड्युटीवर गैरहजर

सदर कोरोनाबाधित तरुणी ही मागील बुधवार पासुन नविन पावर प्लांट मध्ये ड्युटीवर गैरहजर असुन तिची टेस्ट महादुला नगरपंचायत येथे काल केली तिला ताप, सर्दी नाही पण खोकला आहे. आज तिची रिपोर्ट पाँजिटीव आली आहे. तिच्या संपर्कात तिची आई, तिची बहीण तिच्या बहिणींचे दोन अपत्य, मुलगा व मुलगी आहे. काल या बाधित तरुणीला नगरपंचायत येथे बुधवारी टेस्ट करायला तिची बहिण (पं. स. सदस्य), तिचा चिचोली चा मित्र तसेच मैत्रिण हे तिघे तपासणी साठी घेऊन गेले होते. तिच्या महादुला येथील मैत्रिणी ला ताप आहे.
यावेळी बिडीओ कोवे (पं. स. नागपूर ) तसेच गुमथी प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी राहुल राऊत हे घटनास्थळी पोहोचून कोरोंटाईन ची प्रक्रिया पार पाडली. गुमथी प्रा. आ. केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. राहुल राऊत यांनी दखल न्युज भारत पोर्टल ला माहिती दिली की, या कोरोनाबाधित तरुणीला IGMC ला उपचारार्थ दाखल केले असुन उद्या एकुण ९ लोकांच्या टेस्ट करणार आहेत. आज कोरोना पिडितेच्या परिवारातील एकुण ४ जणांना VNIT नागपूर येथे कोरोंटाईन करण्यात आले आहे.
यावेळी महादुला नगरपंचायत चे मुख्याधिकारी संदीप छिद्रावार यांचा नगरपंचायत मधील परिसर नसतांना ही त्यांनी या बिल्डिंग ला सेनिट्राईज केले. E Type 110 हा परिसर बोखारा ग्रा पं अंतर्गत येतो. मात्र बोखारा ग्रा. पं. च्या सरपंच आणि बोखारा ग्रा. पं. सचिव यांची उदासिनता दिसुन आली. बोखारा ग्रा. पं. प्रशासनातर्फे कोणीही व्यक्ती सध्या कोरोना संकटात कोणतीही कारवाई किंवा काळजी घेण्याचे सौजन्य दाखवत नाही.

*POG सेक्शन नविन पावर प्लांट कोराडी चे Executive Engineer चंद्रपुर जिल्हा प्रशासनाकडून पाँजिटीव घोषित; पण अजुनही टेस्ट रिपोर्ट नाही*

कोराडी नवीन पावर प्लांट ३ ×६६० मेगावॉट प्रकल्पातील POG सेक्शन चे Executive Engineer हे आपल्या परिवारास भेटण्यासाठी १० दिवसापूर्वी चंद्रपूर येथे गेले होते. तिथे त्यांना कोरोंटाईन करण्यात आले. त्यांची कोरोना टेस्ट केली असता अजुनही टेस्ट रिपोर्ट त्यांच्या परिवारास दिला नाही पण तरीही त्यांना पाँजिटीव घोषित करुन जिल्हा रुग्णालयात कोरोंटाईन केल्या गेल्याची सुत्रांनी माहिती दिली आहे. उद्या Executive Engineer यांची फैमिली कलेक्टर यांना यासंदर्भात पत्र लिहिणार असुन बिना टेस्ट रिपोर्ट त्यांना कोरोंटाईन का केले? त्यांचे सैंपल कुठे हरविले का? त्यांची रिपोर्ट का मिळत नाही? अशी विचारणा करण्यात येणार असल्याचे समजते.
महाजेनको कोराडी प्रशासनाला याविषयी माहिती मिळताच येथील मुख्य अभियंता राजेश पाटील (३× ६६० मेगावॉट) तसेच राजकुमार तासकर (मुख्य अभियंता २१० मेगावॉट पाँवर प्रोजेक्ट) यांनी वेळीच समयतत्परता दाखवुन या Executive Engineer यांच्याशी थेट संपर्कात असलेल्या ५ जणांना आयसोलेट केले असुन त्यांच्या टेस्ट केल्या. त्यापैकी तिघांच्या टेस्ट निगेटिव्ह आल्या आहेत तर दोघांच्या टेस्ट रिपोर्ट यायचा आहे अशी माहिती महाजेनको कोराडी प्रशासनाकडून दखल न्युज भारत पोर्टल चैनल ला मिळाली आहे. तसेच E Type 110 मधील कोरोनाबाधित तरुणीवर महाजेनको ची दिशाभूल केल्याप्रकरणी काय कारवाई होते याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.

Previous articleलोंबकळत असलेल्या विद्युत तारांकडे विद्युत विभागाचे दुर्लक्ष. लोंबकळत असलेल्या विद्युत तारामुळे जीवित हानीची शक्यता.
Next articleकोराडी सर्कल मधील नाभिक बांधवांना भाजपतर्फे फेस शिल्ड,पी. पी. ई. किट्स, अँप्रराँन,व सेनिटायजर चे निःशुल्क वाटप