लोंबकळत असलेल्या विद्युत तारांकडे विद्युत विभागाचे दुर्लक्ष. लोंबकळत असलेल्या विद्युत तारामुळे जीवित हानीची शक्यता.

 

अश्विन बोदेले
ग्रामीण प्रतिनिधी
दाखवून न्यूज भारत
9850220390

कोजबी :- मौजा करपडा येथील सर्वे नंबर 82 मधील शेतीत विद्युत तारा जमिनीला स्पर्श करण्याच्या मार्गावर असतांना सुद्धा विद्युत वितरण कंपनीच्या कार्यालयात वारंवार अर्ज देऊन सुद्धा टाळाटाळ केली जात आहे. त्याठिकाणी काही जिवितहानी झाली तर त्या जिवितहानी चि जबाबदारी विद्युत वितरण कंपनी घेईल का? असा प्रश्न कोजबी चे माजी सरपंच तथा सर्वे नंबर 82 चे शेतकरी श्री भिमराव मुल्लेवार यांनी प्रसिद्धी पत्रकात कळविली आहे.
नुकतीच घटना ठानेगाव येथे घडली आहे. त्याची जबाबदारी विद्युत वितरण कंपनी ने घ्यायला पाहिजे. आणि विद्युत वितरण कंपनी वर फौजदारी गुन्हा दाखल केला पाहिजे अशी प्रतिक्रिया व्यक्त केली.
ज्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये विद्युत तारा लोंबकळत आहेत ते शेतकरी माजी सरपंच श्री भिमराव मुल्लेवार यांनी प्रत्यक्ष महावितरणच्या कार्यालयात जाऊन लोंबकळत असलेल्या तारांच्या संदर्भात महावितरण विभागाला अर्ज सादर करून आणि प्रत्यक्षात माहिती देऊन ही महावितरण विभागाचे या बाबीकडे दुर्लक्ष होत आहे. महावितरणच्या दुर्लक्ष पणामुळे महावितरण’चा अनागोंदी कारभार समोर येत आहे. व शेतकऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. आता सध्या शेतीचा हंगाम चालू असल्यामुळे सदर शेतकऱ्यांना वारंवार शेतावर जाणे येणे करावे लागते. त्यामुळे त्या लोंबकळत असलेल्या तारांमुळे काही अनुचित घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे सदर गंभीर बाबीची दखल घेऊन महावितरणने लवकरात लवकर लोंबकळत असलेल्या तारा वर खेचून व्यवस्थित रित्या करावे. असे श्री भिमराव मुल्लेवार माजी सरपंच यांनी महावितरणकडे मागणी केलेली आहे.