ऑपरेशन  ऑलआउट पोलीसांच्या जिवावर तर बेतनार नाही ना?जनसामान्यांना सुरक्षा देणारे पोलिसच असुरक्षित पोलिसांच्या संवेदना ओळखुन जोखमीत टाकणे टाळा,प्रशासनाला आर्त हाक

163

 

 

वाशिम(फुलचंद भगत)-सध्या कोरोनाने जिल्ह्यात सर्वञ थैमान घातले असुन कोरोनाची साखळी तोडन्यासाठी रिसोड आणी मंगरुळपीर येथे सात दिवसाचे कडक लाॅकडाऊन जाहीर करणे प्रशासनाला भाग पडले आहे.असे असतांनाच या दरम्यान आॅपरेशन आॅल आऊट पोलिस प्रशासनामार्फत राबवन्यात आले असुन याच दरम्यात कारंजा येथुन संसर्ग झालेल्या सात दंगा नियंञण पथकातील जवान कोरोना बाधित आढळल्यामुळे पोलिस प्रशासनात खळबळ ऊडाली असुन भितिचे वातावरण निर्माण झाले आहेत.इतरांप्रमाणे पोलिसही एक माणुसच असल्याने त्यांनाही संसर्ग होवु शकतो,त्यांचेही कुटुंब असते,जबाबदारीने तेही हवालदिल होवू शकतात या संवेदना समजुन पोलिस प्रशासन जी कोरोना योध्यांची भुमिका निभावत आहे ते अतिशय स्तुत्यपुर्ण आहे हे खरोखरच वाखानन्याजोगे आणी प्रशंसनिय आहे परंतु असे असतांना ‘आॅपरेशन आॅल आऊट’ पोलिस बांधवाच्या जिवावर ऊठल्याचा प्रत्ययही पोलिस बांधवांना कारंजा कोरोना संसर्गावरुन अधोरेखीत होत आहे.
मिळालेल्या माहीतीनुसार कोरोनाच्या पार्श्वभुमीवर जिल्ह्याची धुरा सांभाळणार्‍या धुरंधर नेतृत्वाने आॅपरेशन आॅल आऊट राबवायचे ठरवले तसे आदेश देवुन पोलिस टिम कर्तव्यावर रवाना झाले.हेच आॅपरेशन राबवत असतांना कारंजा येथे काही दंगा नियंञन पथकातले पोलिस कोरोना बाधित असल्याचे टेष्टवरुन पुढे आले.खरोखरच पोलिसांना या माध्यमातुन जोखीमीत तर ढकलल्या जात नाही ना?असा प्रश्न यानिमित्ताने ऊपस्थीत होत आहे.कर्तव्यदक्ष पोलिस अधिक्षक यांना आपल्या पोलिस बांधवांची चिंता जरुर आहे,वेळोवेळी ते त्यांची काळजी घेतातही,कोरोनाकाळात पोलिसांसाठी सरंक्षनात्मक ऊपाययोजनाही राबवत आहेत परंतु त्यांनाच वरुन आदेश आल्यावर पोलिसांना जोखमीत टाकल्याशिवाय गत्यंतर तरी काय? असे एकंदर परिस्थीतीवरुन दिसत आहे.
वाशिमच्या मुख्य चौकात रहदारी सुरळीत करन्यासाठी ट्राफिक कंट्रोलचे आदेश दिलेत त्याप्रमाने एका बाजुची वाहतुक सुरळीत करन्यासाठी तिन बाजुंची वाहतुक थांबवल्या जाते मग त्यामुळे फिजीकल डिसटंन्सिंगचा फज्जा ऊडाला तर नवखे काय? कारंजाला तर दोरी लावुन ट्राफिक सुरळीत करन्याचा प्रयत्न केला गेला यात मोटारचालकाचे किरकोर अपघातही झाले.खरच अशाप्रमाणे वाहतुक रोखणे योग्य आहे का?’दुष्काळात तेरावा महिना’ या ऊक्तीप्रमाने कोरोनाने सर्व व्यवहार ठप्प झालेत,लोकांच्या खिशात दमडीही नाही त्यात मोटार वाहन कायद्याअंतर्गत केसेस वाढवा असे वरुन आदेश,मग पोलिसांना कर्तव्य बजावावेच लागणार ना.पोलिसही निमुटपणे डबलसिट वाहनधारकांना अडवुन,विना मास्कवाल्यांना थांबवुन त्यांचेकडुन दंड वसुल करन्यात गुंतुन दिले परंतु दुसरीकडे यामुळे ते कुठलीही कोरोनाविषयक ठोस सुरक्षा नसतांना लोकांच्या प्रत्यक्ष संपर्कात यायला लागले.पावती,पैसे,गाडीची चाबी काढणे,मोटारसायकल स्वता हातात धरुन बाजुला नेणे यामुळे पोलिस आधिच कोरोणाबाधीत असलेल्यांच्या प्रत्यक्ष संपर्कात येन्याची संभवना नाकारता येत नाही.असेच कारंजा येथुन संसर्ग झालेल्या पोलिस बांधवाच्या बाबतित तर घडले नाही ना?असे यानिमित्ताने दिसत आहे.अत्यावश्यक सेवेत गणल्या गेलेल्या पोलिसांचा यानिमित्ताने जिव धोक्यात टाकन्याचे काम वरिष्ठ यंञणा करतांना दिसत आहे.वाशिम जिल्ह्यापेक्षाही जास्त कोरोना रुग्न असणार्‍या अकोला,हिंगोली आणी इतर जिल्ह्यामध्ये पोलिसांना साप्ताहिक सुट्या,इतर रजा लागु आहेत मग वाशिम बाबतीतच अशी सवतीची भुमिका का? वाशिमच्या पोलिसांना कुटुंब नाही का?सामाजिक आणी कौटुंबिक जबाबदारी नाही का?त्यांना मन संवेदना नाहीत का? हे का वरिष्ठ प्रशासकीय यंञनांना कळत नाही?अहो साहेब,पोलिसांच्या भावना समजुन घेवुन त्यांचा जिव धोक्यात टाकणे आतातरी बंद करा.सर्वसामान्यांची सुरक्षा करुन शांतता प्रस्तापित करन्याची जबाबदारी इमानेइतबारे कर्तव्य बजावणारे पोलिस खरच सुरक्षित आहेत का?हा प्रश्न पडला आहे.एखादा कोरोनाबाधिक रुग्न सापडला तर अख्खी काॅलनी सिल केल्या जाते मग त्या कोरोनाबाधित पोलिसांच्या संपर्कातील पोलिस कोरोना निगेटीव्ह आलेत त्यांना काॅरन्टाइन का केले नाही?लगेच कर्तव्यावर हजर होन्याचे आदेश का?होवु शकते ते प्राथमिक स्टेजमधे संसर्गीत असु शकतात पुढे तेच बाधित आढळले तर त्यांच्या कुटुंबियांच्या आणी त्यांच्या टिमच्या सुरक्षिततेचा प्रश्न कोण विचारात घेणार?पोलिस सुरक्षा देतात पण तेच सध्या असुरक्षित असल्याचे दिसत असल्याने पोलिसांच्या सुरक्षिततेसाठी प्रशासनाने पाउले ऊचलावीत अशी मागणी होत आहे.

फुलचंद भगत
मंगरुळपीर/वाशिम
मो.8459273206
9763007835