Home महाराष्ट्र मुंबई येथील मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी तर्फे वणी येथील मनीष सुधाकर...

मुंबई येथील मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी तर्फे वणी येथील मनीष सुधाकर बुरडकर ला राज्यस्तरीय आदर्श व्यावसायिक उद्योजकता पुरस्कार २०२० जाहीर वणी येथील मूर्तीकाराचा मुलगा साकारत आहे कला व्यवसायात नाव

206

 

प्रतिनिधी:रोहन आदेवार

वणी: येथील रहिवासी असलेल्या मूर्तिकार सुधाकर बुरडकर ह्यांचे पुत्र मनीष बुरडकर ह्यांनी पुणे विद्यापीठातून स्थापत्य अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले आहे. पण अभियांत्रिकी चे शिक्षण घेऊन नौकरी करणे त्यांना मान्य नव्हते , त्यांना स्वतःच व्यवसाय सुरू करायचा होता. घरची परिस्थिती बेताची असल्याने आई वडिलांना हा निर्णय त्रासदायकच होता. ऑनलाईन व्यवसाय सुरू करायची योजना त्यांनी आखली होती पण पुणे सारख्या नवख्या शहरात जाऊन हे सगळं करणं आई वडिलांना कठीण वाटत होते. व्यवसायात काहीच ठरलेलं नसतं हे मनीष ह्यांना माहिती होते , येईल त्या परिस्थितीचा सामना करायचा पण व्यवसायच करायचा निर्धार होता. ऑनलाईन गणपती विक्री करत व्यवसायाची सुरुवात केली , नंतर इतर शोभेच्या वस्तूंची ऑर्डर सुद्धा यायला लागल्या.घरी कलेचा वारसा आणि वडील आणि बंधू पंकज बुरडकर मूर्तिकार असल्याने मनीष ह्यांना कला आणि कला प्रकारा बद्दल ज्ञान होते.म्हणून व्यवसाय उभारणीला त्रास झाला नाही पण व्यवसाय सांभाळताना त्यांना चांगले वाईट अनुभव आले त्यातून ते शिकले आणि चालत राहिले.कला क्षेत्रात व्यवसाय करायचे ठरवले पण संधी कुठं कशी मिळवावी ह्याची माहिती सुरुवातील अजिबात नव्हती , मिळेल ते काम करण्याची तयारी असल्याने बांधकाम क्षेत्रात देखील त्यांना संधी मिळाली. बांधकाम क्षेत्रात लागणाऱ्या शोभेच्या वस्तूंचे ऑर्डर्स ते घेऊ लागले. आज पुण्यातील अनेक नामांकित कंपनी सोबत बुरडकर ह्यांच्या कंपनी ने काम केले आहे.२०१९ साली मनीष बुरडकर ह्यांना मुंबई येथे कॉटन सिटी युथ आयकॉन पुरस्काराने गौरविण्यात आले होते. मनीष बुरडकर ह्यांना मुंबई येथील मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी तर्फे राज्यस्तरीय आदर्श व्यावसायिक उद्योजकता पुरस्कार २०२० जाहीर झाला असून १५ सप्टेंबर २०२० रोजी पुणे येथे प्रदान करण्यात येणार आहे.

मनीष त्याच्या यशाचे श्रेय आई वडिलांना आणि आपल्या परिवाराला देतो , त्यांनी सुरुवातीला विरोध जरी केला असला तरीही तो काळजी पोटी होता हे मला नंतर लक्षात आले. कला परिवारात वाढलो असल्याने कला आणि कलाकारं बद्दल जवळीक असल्याने मला ह्या क्षेत्रात अजून जोमाने काम करण्याची प्रेरणा मिळते.

Previous articleदेसाईगंज ची गायत्री सुधीर सोनटक्के ही जिल्ह्यातून प्रथम आ.कृष्णा गजबे यांनी घरी जाऊन केले अभिनंदन
Next articleऑपरेशन  ऑलआउट पोलीसांच्या जिवावर तर बेतनार नाही ना?जनसामान्यांना सुरक्षा देणारे पोलिसच असुरक्षित पोलिसांच्या संवेदना ओळखुन जोखमीत टाकणे टाळा,प्रशासनाला आर्त हाक