देसाईगंज ची गायत्री सुधीर सोनटक्के ही जिल्ह्यातून प्रथम आ.कृष्णा गजबे यांनी घरी जाऊन केले अभिनंदन

437

 

पंकज चहांदे
तालुका प्रतिनिधी
दखल न्यूज भारत

देसाईगंज – फेब्रुवारी महिन्यात घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल गुरुवारी आॅनलाईन जाहीर करण्यात आला. देसाईगंज येथील महात्मा गांधी कला, विज्ञान विद्यालयातील विज्ञान शाखेची विद्यार्थिनी गायत्री सोनटक्के ही ९६.७० टक्के घेऊन जिल्ह्यात प्रथम आली आहे.
विद्यालय तसेच आई वडीला पाठोपाठ देसाईगंज शहराचे पण नाव रोशन केलं. अश्यातच आज दिनांक १८ जुलै रोजी आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार कृष्णा गजबे यांनी तिच्या शिवाजी वॉर्ड येथील राहत्या घरी भेट देऊन तिला पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले.