Home महाराष्ट्र सत्यनारायण सन्मित्र सेवा मंडळाने जपली सामाजिक बांधिलकी

सत्यनारायण सन्मित्र सेवा मंडळाने जपली सामाजिक बांधिलकी

118

 

प्रतिनिधी / प्रसाद गांधी.

गुहागर : गेल्या काही महिन्यांपासून जगभरात कोरोना विषाणू या महाभयंकर रोगाने थैमान घातले आहे, रोगावर नियंत्रण मिळवण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने लोकडाऊन जाहीर केल्यापासून नागरिकांना रोजगार मिळत नाही . काहींचे व्यवसाय बंद आहेत ,नोकरी वर जाता येत नाही. अशा कठीण काळात गरजू लोकांना सामाजिक बांधिलकी म्हणून श्री स्वामी समर्थ मठ (रजी.) साई हिल चे अध्यक्ष श्री नरेश जगन्नाथ बारे आणि पंचमुखी सेवा संस्थान भांडुप मुंबई चे अध्यक्ष श्री जगन्नाथ अनंत कदम आणि मळण गावचे सुपुत्र श्री विनय रामभाऊ जाधव यांच्या संकल्पनेतून मळण गावातील गरजू लोकांना मदत म्हणून तूरडाळ ( 400 किलो)आणि तांदूळ (2 टन ) धान्य वाटप करण्याचा प्रस्ताव श्री सत्यनारायण सन्मित्र सेवा मंडळ (रजी.)मळण कुंभार वाडी तालुका गुहागर जिल्हा रत्नागिरी या समाज कार्यात अग्रेसर असणाऱ्या मंडळापुढे ठेवला, आणि हा समाज उपयोगी प्रस्ताव मंडळाने स्वीकारला.
त्याप्रमाणे श्री सत्यनारायण सन्मित्र सेवा मंडळाने पुढाकार घेऊन सदर धान्य वाटपाचे सुयोग्य नियोजन केले आणि दिनांक 15 जुलै 2020 रोजी सत्यनारायण सभागृह मळण कुंभारवाडी या ठिकाणी गावातील साधारण 400 कुटुंबाना 5किलो तांदूळ आणि 1किलो तूरडाळ या प्रमाणात धान्याचे वाटप केले.
वाटप करताना मंडळाचे सल्लागार श्री मोहनशेठ तांबे, श्री अशोक जाधव, श्री दिलीपशेठ साळवी, श्री अशोक धोंडू साळवी श्री कृष्णा य. साळवी मंडळाचे माजी सचिव श्री सोमा साळवी, जेष्ठ कार्यकर्ते श्री वसंत रामचंद्र साळवी ,श्री शांताराम भागोजी शिगवण ,विद्यमान अध्यक्ष मनोहर साळवी ,सचिव प्रमोद साळवी ,किशोर साळवी ,माजी अध्यक्ष विलास साळवी ,राजाराम जाधव ,चंद्रकांत साळवी ,प्रफुल्ल साळवी मंगेश साळवी, दिनेश साळवी, रविंद्र साळवी आणि मंडळातील सर्व युवा कमिटी सदस्य उपस्थित होते.

*दखल न्यूज भारत*

Previous articleअंतिम वर्षांच्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळावा याकरिता मासूने “जनहित याचिका” क्र.CJ-LD-VC-No.42/2020 यामध्ये हस्तक्षेप अर्ज दाखल केला आहे.
Next articleदेसाईगंज ची गायत्री सुधीर सोनटक्के ही जिल्ह्यातून प्रथम आ.कृष्णा गजबे यांनी घरी जाऊन केले अभिनंदन