दोन वर्षीय बालिकेवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला जाहीर फाशी द्या घुग्घुस काँग्रेस तर्फे ठाणेदारा मार्फत पालकमंत्री यांना निवेदन

प्रशांत चरड़े,
चंद्रपुर जिल्हा प्रतिनिधि,
चंद्रपूर :सावली तालुक्यातील पाथरी गावात अंगणात खेळत असलेल्या दोन वर्षीय चिमुकलीला घरात नेऊन जितेंद्र मेश्राम या नराधमाने अमानुषरीत्या बलात्कार केला आहे. ही माणुसकीला काळिमा फासणारे कृत्य असून समाजात अश्या नराधमांना जगण्याचा अधिकार नाही.
देशभरात महिला सुरक्षा धोक्यात आली असून महिलांवरील गुन्हात दिवसागणिक वाढच होत आहे.
करिता या नराधमांना जाहीर फाशी देण्यात यावी
या मागणीचे निवेदन आज दिनांक 18 जुलै रोजी 2020 रोजी घुग्घुस कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजूरेड्डी यांच्या नेतृत्वाखाली घुग्घुस पोलीस स्टेशनचे ठाणेदार राहुल गांगुर्डे यांच्या मार्फत पालकमंत्री श्री. विजय वड्डेटीवार यांना देण्यात आले आहे.
याप्रसंगी सौ. संगीता ताई बोबडे, सौ. पदमा त्रिवेणी, सौ. संध्या मंडल, सौ. रेखा रेगुंडवार, सौ. मंगला पोलशेट्टीवार, सौ. लक्ष्मी गोंडाडे, सौ.पायल मडावी, कामगार नेते सय्यद अनवर आदी उपस्थित होते.