पत्रकारासह तीन पॉझीटिव्ह कन्हानचे एकुण १९ रूग्ण

721

 

कमलसिह यादव
पाराशीवनी तालुका प्रतिनिधी
दखल न्युज भारत,नागपुर

कन्हान(ता प्र) : – कामठी च्या संपर्कातील पिपरी कन्हानचे दोन कोरोणा रूग्णाने सिरकाव होत कन्हान व ग्रामिण मध्ये १६ रूग्ण असताना आज रॅपेट तपास णीत एका पत्रकारासह तीन रूग्ण होऊन एकुण १९ संख्या झाली. आणि तीन दिवसाची स्वॅब तपासणी अ़द्याप आली नसल्याने कन्हान शहरात खडबड उडाली आहे.
कामठीचा कोरोना पॉझीटिव्ह साळयाच्या संपर्कात आलेला दि.१३ जुलै ला पिपरी (कन्हान) येथील जावई, कोरोना पॉझीटिव्ह प्रथम मिळाला. त्याच्या संपर्कातील ६५ वर्षिय म्हातारी, ४५ वर्षिय बहिण, ४ वर्षाचा बोरडा (गणेशी) येथील भाचा पॉझीटिव्ह आढळला. असे चार आणि खैरी कामठी येथिल मुर्ती कम्पनीत काम करणारा
४५ वर्षिय एक असे पाच. दि १४ ला अशोक नगर कन्हान चा एक व रॅपेट तपासणीत पिपरीची एक महिला असे दोन. दि १५ ला कांद्री येथील जि प अध्यक्षा रश्मी बर्वे चे पती सह नऊ यात कांद्रीचे पाच, टेकाडी कोळसा खदान दोन, कॉलोनी एक व कन्हान एक असे नऊ रूग्ण मिळाल्याने तीन दिवसात कन्हान – २, पिपरी – ५, कांद्री – ५, टेकाडी कोळसा खदान – २ , कॉलोनी – १ व बोरडा (गणेशी) – १ असे एकुण सोळा रूग्ण कन्हान शहर व ग्रामिण मध्ये आणि जिल्हाधिकारी यांच्या कन्हान बैठकीतील एक मिळाल्याने (दि.१८) मुकबधिर शाळा कांद्री येथे ६६ व्यकतीची रॅपेट तपासणी केली असता एका पत्रकार त्याची आई व देशी दारू दुकानातील नौकर असे तीन मिळाल्याने एकुण १९ संख्या पोहचली आणि दि.१५ ते १७ या तीन दिवसाची स्वॅब तपासणी रिर्पोट पेंडीग असल्याने कन्हान परिसरा त खळबळ उडाली आहे.