पोलिस दला तरफै आरोग्य शिबिर

सचिन श्यामकुंवर तालुका प्रतिनिधी
दखल न्यूज भारत..
आमगांव…गोंदिया जिल्हा पोलीस दलातर्फे पोलीस अधीक्षक श्री. मंगेश शिदे, अपर पोलीस अधीक्षक श्री अतुल कुलकर्णी यांचे मार्गदर्शानाखाली श्री जालींदर नालकुल उपविभागिय पोलीस अधिकारी आमगांव यांचे उपस्थितीत आज दिनांक 18/07/2020 रोजी पोलीस स्टेशन सालेकसा अंतर्गत सशस्त्र दुरक्षेत्र बिजेपार येथील मौजा मरामजोब येथे आरोग्य शिबीर घेण्यात आले. सदर शिबीरास प्राथमिक आरोग्य केंद्र बिजेपारचे वैद्यकिय अधिकारी डॉ. सुखदा पांडे, डॉ ठाकरे, यांच्या चमुसह तसेच गोंदिया होमिपॅथिक मेडिकल कॉलेज येथील वैद्यकिय अधिकारी डॉ.कानतोडे, याचे चमुसह व सालेकसा येथील फिरते आरोग्य पथक उपस्थित राहुन ग्राम मरामजोब येथील ग्रामस्थाना कोरोणा या विषाणु संदर्भात मार्गदर्शन करून ग्रामस्थांची कोरोणा आजारा संदर्भात महिला, पुरूष व बालक असे एकुन 179 ग्रामस्थांची बिपी, शुगर, ताप व इतर आजारांचे संबधी आरोग्य तपासणी करून औषधीचे व कोरोणा आजारा संबधीचे होमिपॅथिक औषधीचे वितरन करण्यात आले .
सदर आरोग्य शिबीरास श्री जालींदर नालकुल उपविभागिय पोलीस अधिकारी आमगांव यांनी प्रत्यक्ष भेट देवुन आरोग्य शिबीराची पाहनी केली तसेच मरामजोब येथील 179 लोकांना मास्कचे वाटप करून, कोरोणा प्रादुर्भाव पासुन कसा बचाव करता येईल ,कशी काळजी घ्यावी ,तसेच नक्षलग्रस्त भागातील जनता व पोलिस यांचे संबंध कसे सुधारतील यावर भर देता येतील लोकांच्या गावातील समस्या जाणुन घेतल्या. सदर आरोग्य शिबीर ग्राम मरामजोबचे सरपंच सौ. गायत्री दिलीप राणे , उपसरपंच श्री दिपक नेताम, ग्रामपंचायत सदस्य नुतनलाल तुरकर, सौ.गिताबाई उईके व गावातील इतर प्रतिष्ठीत नागरीकांच्या उपस्थितीत पोलीस विभागातर्फे, पो.स्टे सालेकसाचे ठाणेदार श्री डुणगे सा. तसेच सशस्त्र दुरक्षेत्र बिजेपारचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक दिपक जमदाडे सा, परिवीक्षाधिन पोलीस उपनिरीक्षक पांडुरंग मुंडे , राजीव केंद्रे व कर्मचारी यांनी उपस्थित राहुन पोलीस दलातर्फे इंन्फ्रारेड फोरहेड थर्मामिटर व ऑक्सीमिटर या उपकरनाद्वारे मरामजोब येथील ग्रामस्थांची तपासणी करुन सदर आरोग्य शिबिर सामाजीक अंतर ठेवुन यशस्वीरीत्या पार पाडले.