Home महाराष्ट्र प्राचार्य रवींद्र परदेशी मुंबई महापालिका शिक्षण विभागातर्फे मोफत योगा प्रशिक्षण सुरु.

प्राचार्य रवींद्र परदेशी मुंबई महापालिका शिक्षण विभागातर्फे मोफत योगा प्रशिक्षण सुरु.

136

 

 

दिलीप अहिनवे
मुलुंड मुंबई उपनगर प्रतिनिधी
दखल न्युज भारत
मो. 9323548658

मुंबई, दि. १८ : १६ मार्चपासून बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभागाच्या सर्व शाळा बंद आहेत. “वर्क फ्रॉम होम” अंतर्गत आपल्या विद्यार्थ्यांसोबत शिक्षक जोडले गेले आहेत. मुलांच्या अडीअडचणींची विचारपूस करत आहेत. योग्य त्या मार्गदर्शनासोबत मुलांना विविध आॅनलाईन साधनांद्वारे अभ्यास देत आहेत. लॉकडाऊन कालावधीत शिक्षक, विद्यार्थी, पालक व समाजाचे स्वास्थ्य तंदुरुस्त राहणे गरजेचे आहे. डॉक्टर तसेच अनेक क्षेत्रातील तज्ज्ञ मंडळींनी योगसाधना व प्राणायाम करुन रोग प्रतिकारक शक्ती वाढु शकते असे मत मांडले आहे.

मुंबई महापालिका शिक्षणाधिकारी महेश पालकर, उपशिक्षणाधिकारी (मध्यवर्ती) राजु तडवी, ममता राव (माध्यमिक), वरिष्ठ पर्यवेक्षक रामेश्वर लोहे व पर्यवेक्षक राजेश गाडगे यांनी सलग दोन महिने मनपा शिक्षकांना मोफत योगा प्रशिक्षणाचे अचूक नियोजन केले होते. शारीरिक शिक्षण प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य रवींद्र परदेशी यांच्या मार्गदर्शनानुसार योगतज्ज्ञ रेणू निशाणे व जयंत निशाणे अतिशय चांगल्याप्रकारे योगसाधना प्रशिक्षण विनामूल्य देत होते. अधिकारी, शा. शि. शिक्षक व शहर संसाधन केंद्रातील कर्मचारी यांनी या प्रशिक्षणाचा लाभ घेतला.

संपुर्ण जगात कोवीड १९ विषाणुने थैमान घातले आहे. जागतिक व देशांतर्गत सर्व व्यवहार ठप्प झालेले आहेत. शाळा व शिक्षण पध्दतीत अमुलाग्र बदल झालेले आहेत. सोशल डिस्टन्सिंग, तोंडाला मास्क लावणे, वारंवार साबणाने हात धुणे, गरम पाणी पिणे, कोमट पाण्याने गुळण्या करणे, विविध आयुर्वेदिक काढे घेणे, गरम दुधात हळद टाकुन पिणे, आयुर्वेदिक गोळ्यांचे सेवन करणे इ. उपाय करुन प्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरु आहेत.

योगसाधना व प्राणायाम हा कोरोनावर सर्वात महत्त्वपुर्ण उपाय आहे असे डॉक्टर व विविध क्षेत्रातील मान्यवरांनी ठासुन सांगितले आहे. प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांनी सांगितले आहे की, “हे वर्ष केवळ जगण्याचे वर्ष आहे. फायदा तोटा बघण्याचे नाही.” प्राचार्य रवींद्र परदेशी यांनी हा मुद्दा लक्षात घेऊन १४ जुलै पासून शाळा उघडतील तोपर्यंत खास शा. शि. शिक्षक तसेच अधिकारी वर्गासाठी मोफत योगा प्रशिक्षण परत एकदा सुरु केले आहे. मानसिक व शारीरिक दृष्ट्या सक्षम होण्यासाठी नियमित व्यायाम, योगा व प्राणायाम करणे आवश्यक आहे. मनःशांती योगसाधनेतुन नक्कीच मिळु शकते. सध्या मनपा शिक्षक व अधिकारी वर्गासोबत त्यांच्या कुटुंबातील इतर सदस्य देखील या अभियानात सहभागी होत आहेत.

सोमवार, बुधवार व शुक्रवार दरम्यान शा. शि. विभाग क्र. १ ते ११, तर मंगळवार, गुरुवार व शनिवार यादिवशी शा. शि. विभाग क्र. १२ ते १७ व मनपाच्या माध्यमिक शाळांमधील शा. शि. शिक्षक आॅनलाईन उपस्थित राहुन मार्गदर्शन घेत आहेत. गुगल मीट अॅपद्वारे सकाळी ८ ते ९.१५ यावेळेत दररोज १०० शिक्षक व अधिकारी हे प्रशिक्षण घेत आहेत.

Previous articleबावडा-लाखेवाडी जिल्हा परिषद गटातील ज्येष्ठ नागरिकांना व गरजूंना रोगप्रतिकारक गोळ्यांचे वाटप
Next articleकेंद्र सरकार साखर उद्योगाबाबत सकारात्मक- हर्षवर्धन पाटील        – लवकरच चांगले निर्णय अपेक्षित