साहित्यरत्न डॉ. अण्णाभाऊ साठे यांना बरिएमं तर्फे अभिवादन!

 

सुनील उत्तमराव साळवे
(९६३७६६१३७८)
कार्यकारी संपादक, दखल न्यूज भारत नागपुर

दीक्षाभुमी /नागपुर : १८ जुलै २०२०
जग बदल घालुनी घाव, सांगुन गेले मला भीमराव असे सुप्रसिध्द लोकशाहीरीतुन समस्त महाराष्ट्रात प्रबोधन करणारे साहित्यरत्न डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या स्म्रृतीदिन निमित्त आज नागपूर येथे बहुजन रिपब्लिकन एकता मंचच्या वतीने आदरांजली वाहुन अभिवादन करण्यात आले.
दीक्षाभुमी नागपूर येथील लोकशाहीर, साहित्यरत्न डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याला बहुजन रिपब्लिकन एकता मंचच्या संस्थापक अध्यक्ष तथा राष्ट्रीय अल्पसंख्यक आयोग भारत सरकार च्या सदस्या अँड. सुलेखाताई कुंभारे यांनी माल्यार्पण केले तसेच आदरांजली सुद्धा अर्पण केली.
यावेळी बहुजन रिपब्लिकन एकता मंचच्या नगरसेविका कु. वंदना भगत, भीमराव फुसे, महेंद्र थुल, भारत जवादे, अशोक नगरारे, अरविंद वाळके तसेच कवी तन्हा नागपुरी आदी प्रामुख्याने उपस्थित होते.