खळबळजनक बातमी, चाकुने सपासप वार करुन ईसम गंभिर जखमी, बोर्डा येथिल घटना,आरोपी वणी पोलीसांच्या ताब्यात

0
961

 

वणी : परशुराम पोटे

वणी पोलीस स्टेशन अंतर्गत येणार्या बोर्डा येथे ए का ईसमाला चाकुने सपासप वार करुन गंभिर जखमी केल्याची खळबळजनक घटना घडली आहे.
बालाजी दशरथ निंदेकर(65)रा.बोर्डा असे जखमीचे नाव आहे.तर राजकुमार मारोती थाटे(28) रा.बोर्डा असे आरोपीचे नाव आहे. दोन दिवसा अगोदर बालाजीने आरोपी राजकुमारला तु गावातच का राहते? कामधंदे का करित नाही? असे म्हणुन हटकले होते.याच बोलण्याचा राग आरोपीच्या मनात होता. आज दि.18 जुलै ला सकाळी 9 वाजताचे दरम्यान बालाजी बोर्डा येथुन वणीला कामावर जात असतांना आरोपी राजकुमार याने रस्त्यावर आडवे होवुन बालाजीवर चाकुने सपासप वार केले.या घटनेची माहिती गावकर्यांना मिळताच गावातील उपसरपंच व गावकरी धावून आले.व गंभिर जखमी झालेल्या बालाजीला तात्काळ वणी येथिल ग्रामिण रुग्णालयात दाखल केले. जखमीची प्रक्रुती गंभिर असल्यामुळे पुढिल उपचाराकरिता चंद्रपुर ला हलविण्यात आले आहे. या घटनेची तक्रार वणी पोलीसात केली असता, या तक्रारीवरुन आरोपी विरुद्ध भादंवी ३०७ कलमानुसार गुन्हा नोंद करुन प्रभारी पोलीस निरिक्षक निखिल फटिंग यांनी तपासाचे चक्रे हलवुन सहापोनी/ माया चाटसे व अविनाश बनकर यांच्यासह बोर्डा येथे जावुन आरोपीस शिताफीने ताब्यात घेतले.