Home अमरावती कौशल्याबाई बारब्दे कनिष्ठ महाविद्यालयाने राखली उज्वल यशाची परंपरा 

कौशल्याबाई बारब्दे कनिष्ठ महाविद्यालयाने राखली उज्वल यशाची परंपरा 

273

सुयोग टोबरे /7020836838
उपजिल्हा प्रतिनिधी
दखल न्यूज भारत अमरावती

अंजनगाव सुर्जी- श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती द्वारा संचालित कौशल्याबाई बारब्दे कनिष्ठ महाविद्यालय चिंचोली बु. येथील विद्यार्थ्यांनी आपली उज्वल यशाची परंपरा कायम राखली नुकत्याच जाहीर झालेल्या बारावीच्या निकालात एकूण परीक्षेला प्रविष्ठ झालेल्या 49 विद्यार्थ्यांपैकी 44 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून निकालाची टक्केवारी 89.79% एवढी आहे उत्तीर्ण विद्यार्थ्यां पैकी 2 विद्यार्थी प्राविण्य श्रेणीत, 16 विद्यार्थी प्रथम श्रेणीत तर 26 विद्यार्थी द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत.
ग्रामीण भागातील या शाळेतून कु. स्वाती अशोकराव माहोकार हिने 552 गुण/ 85% गुण मिळवले कु. संजीवनी विलासराव वानखडे हिने 514 गुण /79% गुण मिळवले व कु. मोनिका दिलीपराव येवले या विद्यार्थिनी गुणानुक्रमे शाळेतून प्रथम द्वितीय आणि तृतीय क्रमांकाच्या मानकरी ठरल्या.
या ग्रामीण भागातील गुणवंत विद्यार्थिनीचा नुकताच विद्यालया तर्फे गौरव करण्यात आला. शाळा समिती सदस्य विश्वासराव बारब्दे, मुख्याध्यापक राजेंद्र गायगोले, ज्येष्ठ शिक्षक जगदीश मोहोड, प्रा. मनोज सोनपरोते, प्रा. अनिल मेहरे यांचेसह सर्व शालेय घटक सुरक्षित अंतर ठेवून उपस्थित होते सोबतच शाळा समिती अध्यक्ष डॉ.शेळके, शाळा समिती सदस्य शिवराव देशमुख, शाळा निरीक्षक विनायकराव गावंडे यांनी या सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
विद्यार्थ्यांनी आपल्या यशाचे श्रेय आई वडील, मुख्याध्यापक व मार्गदर्शक शिक्षक यांना दिले सेवाभावी वृत्तीने इंग्रजी विषयाचे मार्गदर्शन करणारे सातेगाव येथील प्राध्यापक अनिल मेहरे यांचे विद्यार्थ्यांनी विशेष आभार मानले.

Previous articleउडाणे यथील स्वामी विवेकानंद युवा मंच तर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
Next articleखळबळजनक बातमी, चाकुने सपासप वार करुन ईसम गंभिर जखमी, बोर्डा येथिल घटना,आरोपी वणी पोलीसांच्या ताब्यात