उडाणे यथील स्वामी विवेकानंद युवा मंच तर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

159

राजू हालोर प्रतिनिधी धुळे विभागीय दखल न्युज

स्वामी विवेकानंद युवा मंच धुळे जिल्हा यांच्या मार्फत आनंदखेडे केंद्रात बारावी च्या परीक्षेत टॉप टेन आलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार त्यांच्या घरोघरी जाऊन त्यांच्या सहकुटुंब सत्कार करण्यात आला .तसेच विद्यार्थ्यांना व त्यांच्या पालकांना मास्क वाटप करून गुणवंत विद्यार्थ्यांना भावी वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या व पुढील करियर विषय मार्गदर्शन करण्यात आले .या वेळी स्वामी विवेकानंद युवा मंच सदस्य देवेंद्र नवसारे राहुल पाटील पै .भटू बागूल पत्रकार राजू हालोर योगेश गोसावी दत्तू मासूले व ग्रामस्थ उपस्थित होते .