चिखलदरा दखल न्युज तालुका प्रतिनिधी अबोदनगो चव्हाण
चिखलदरा -:चिखलदरा तालुक्यातील काटकुंभ या गावातील बाजार चौकातील दुकाने आज उघडण्यात आली आणि काटकुंभ येथे जनता कर्फ्युचे पालन होत नसल्याचे समोर येत आहे आणि दुकानदारांनी एक प्रकारची दादागीरी केल्याचे समोर येत आहे व आमचे कोण काय करणार असा दम दाखवत आहे.सोशल डिस्टन्सिंगचे सुध्दा पालन नाही व मास्क सुध्दा लावलेले दिसत नाही. जिल्हाधिकारी व.जिल्हा अधिकारी यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवली आहे काटकुंभ येथील एकही दुकान दारांनी आदेशाचे पालन केले नाही. यावर पोलीस प्रशासन व तहसील कार्यालयातील अधिकारी यांचे लक्ष नाही. आदेश न पाडणार्या दुकानदारांवर कार्यवाही ची मांगणी काटकुंभ गावातील व परिसरातील नागरिकांनी केली आहे.
काही दिवसांपूर्वी काही ही सूचना न देता प्रति दुकान दोनशे रुपये पटवारी व ग्रामपंचायत कर्मचारी यांनी वसुली केली पण आज एक ही कर्मचारी व अधिकारी याला का दिसत नाही. व सचिवांच्या खोट्या स्वाक्षरीने वसुली केली होती दंडाची पावतीवर सचिवाची सही गावातील कामदार मारतो.हा प्रकार उघडकीस आला आहे.पण आज हे अधिकारी कोठे गेले. अशा प्रश्न आज निर्माण होत आहे.आज का दंड देत नाही. फक्त काटकुंभ या गावातील एकमेव चव्हाण किराणा बंद. आहे.