ग्राम पंचायत खांदला च्या वतीने जि.प.प्राथमिक शाळा मरनेली येथे मास्क व सेनीटायझर चे वाटप

169

 

प्रतिनिधी/ रमेश बामनकर

गुड्डीगुडम:अहेरी पंचायत समिती अंतर्गत ग्राम पंचायत खांदला च्या वतीने कोविड -19 चा प्रादुर्भाव लक्षात घेऊन जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मरनेली येथील विद्यार्थ्यांना मास्क व सेनीटायझर चा वाटप ग्रा.प.चे सरपंचा सौ.शकुंतला कुळमेथे यांच्या हस्ते करण्यात आले आहे.
मास्क व सेनीटायजर वापरण्याची पद्धत विद्यार्थी व शिक्षकांना समजावून सांगण्यात आले आहे.
याप्रसंगी माधव कुळमेथे, वेंकटेश अलोने, सुरेश पेंदाम, नामदेव पेंदाम, शिक्षकवृंद, ग्राम पंचायत सदस्य व विद्यार्थी आणि शाळा समितीचे सदस्य गन आणि ग्रामस्थ उपस्थित होते.