खापरखेडा बनते आहे कोरोना चे हाँट स्पाँट; आज पुन्हा २ व्यक्ति मिळाले पाँजिटीव; चनकापुर व चिचोली मध्ये आढळले एक – एक पेशंट

0
1105

 

सुनील उत्तमराव साळवे(९६३७६६१३७८)
कार्यकारी संपादक, दखल न्यूज भारत नागपुर

खापरखेडा / नागपुर:१८ जुलै २०२०
नागपुर जिल्ह्यातील खापरखेडा शहर सध्या कोरोना चे हाँट स्पाँट बनत आहे. काल खापरखेडा शहरातील वार्ड नं १ पोटा चनकापुर ग्रा पं येथे २२ वर्षिय युवक कोरोना पाँजिटीव निघाला होता. त्याच्या संपर्कात आलेल्या एकुण ९ जणांना कोरोंटाईन करण्यात आले होते. त्यापैकी आज एकाचा रिपोर्ट पाँजिटीव आला आहे.
वार्ड क्रमांक ४ पोटा-चनकापुर येथील ५५ वर्षिय व्यक्तिचा रिपोर्ट पाँजिटीव आला असुन इतर ८ जणांचे रिपोर्ट अजुन यायचे आहेत. काल कोरोना पाँजिटीव मिळालेल्या युवकाचा कामठीतील पाँजिटीव पेशंट च्या संपर्क असल्याचे पुढे आले आहे. ही चैन लिंक तोडणे आवश्यक आहे. परंतु आता कालच्या २२ वर्षिय युवक जो खापरखेडा वीज केंद्रात बाँयलर विभागात होता त्याच्या संपर्कात आलेल्या इतर कामगार, अधिकारी व कर्मचारी यांचा खापरखेडा वीज केंद्रात शोध सुरु असल्याचे समजते. यासंबंधी अजुन अधिक्रृत माहिती आली नाही.
आज पोटा चनकापुर येथे वार्ड क्रमांक ४ मध्ये एरिया सील करण्याची प्रक्रिया सुरू आहे. तसेच येथील परिसर सेनिट्राईज करण्यात येत असल्याची माहिती पोटा चनकापुर ग्रा पं. च्या सरपंच वंदना ताई ढगे, सचिव रहाटे जी, कर्मचारी प्रविण घोडमारे यांनी दिली आहे. यावेळी या भागात चिचोली प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉ. पेटकर मैडम् , पं. स. सावनेर चे विस्तार अधिकारी साबळे, शेंडेजी विस्तार अधिकारी, तलाठी मोहितकर,आदी पोहोचले आहेत. अंबुलंस अजुन यायची आहे.

चिचोली ग्रा. पं. मधील एक बुजुर्ग व्यक्ति निघाले पाँजिटीव

खापरखेडा चिंचोली येथील वार्ड क्रमांक ४ मध्ये एक ६२ वर्षिय बुजुर्ग व्यक्ति कोरोना पाँजिटीव निघाले आहे. ते कुणाच्या संपर्कात आले होते? किंवा त्यांची काही ट्रेवल हिस्ट्री आहे? हे अद्याप प्रशासनाला कळले नाही. माहिती काढणे सुरु आहे तसेच या बुजुर्ग व्यक्ति च्या संपर्कात असलेले त्यांच्या कुटुंबातील एकुण ९ जणांना सावनेर पब्लिक स्कूल मध्ये कोरोंटाईन करण्यात येणार असल्याचे सचीव व्ही. आर. लंगडे यांनी सांगितले. यावेळी सरपंच पुरुषोत्तम चांदेकर, ग्रा. पं. सदस्या सौ. मंगलाताई नखाते, तसेच ग्रा. पं सदस्य संदीप सोमकुंवर आदी उपस्थित होते.