विश्र्वशांती विद्यालयाचे सुयश

 

सावली..
विश्वशांती उच्च माध्यमिक विद्यालय ,सावली, ता. सावली जिल्हा -चंद्रपूर च्या कला विभागाचा निकाल ९०.२४ टक्के , विज्ञान विभागाचा १००टक्के, वाणिज्य विभाग ६८.७५टक्के आणि एच. एस.सी. व्ही. सी. विभाग ५५.१७ टक्के असून कला विभागातून सावली तालुका प्रथम कुमारी तृप्ती ज्ञानेश्वर मुसद्दीवार हिला ८६.३०टक्के आहे. तसेच कला विभागातून सावली तालुका द्वितीय कुमारी यशोधरा प्रकाश घोटेकार हिला ८४.३०टक्के गुण आहेत. कला विभाग तृतीय कुमारी आशाली मोरेश्वर मोहुर्ले हिला ७९.८४ टक्के गुण आहेत.
विज्ञान विभागातून प्रथम संकेत संतोष संचेती ७८.७७ टक्के गुण, द्वितीय कु प्रांजली प्रशांत दंडावार ७७.३८ टक्के गुण, तृतीय कुमारी निशू जिवनदास लेनगुरे ७३.३८ टक्के गुण मिळालेले आहेत.
वाणिज्य विभागातून प्रथम रोहीत सुधाकर चौधरी ७७.३८ टक्के गुण, द्वितीय कुमारी लक्ष्मी केशव चौधरी ७६.००टक्के गुण व तृतीय कुमारी इशिका किशोर वडेट्टीवार ७४.१५टक्के गुण मिळालेले आहेत.
एच. एस. सी. व्ही. सी . विभागातून प्रथम अंकुश दिवाकर गेडाम ६९.८४टक्के गुण (पिकशास्त्र), द्वितीय कुमारी प्रतिक्षा रुषी भोयर ६८.१५टक्के (उद्यानशास्त्र), तृतीय सुधीर प्रभाकर गेडाम ६३.६९टक्के (विद्युतशास्त्र) गुण मिळालेले आहेत.
भारत शिक्षण प्रसारक मंडळ, सावलीचे अध्यक्ष मान. संदीप भाऊ गड्डमवार, सचिव मान. राजाबाळ पाटिल संगीडवार, सहसचिव मान.मनोजभाऊ सुरमवार,उपाध्यक्ष मान. सौ. नंदाताई अल्लुरवार, उपाध्यक्ष मान. अनिलभाऊ स्वामी, कोषाध्यक्ष मान. डॉ. विजयराव शेंडे, शाळा समितीचे अध्यक्ष मान. डॉ. मधुकरराव कोतपल्लीवार तथा सर्व पदाधिकारी आणि मुख्याध्यापक मोरेश्वर बुर्रीवार तथा सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी विश्वशांती विद्यालय तथा उच्च माध्यमिक विद्यालय, सावली तर्फे वरील सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे कौतुक करून हार्दिक अभिनंदन करण्यात आले व त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा देण्यातआल्या.