वडसा येथील 4 SRPF जवान कोरोनामुक्त

188

 

जगदीश वेन्नम /हर्ष साखरे दखल न्युज भारत

आज वडसा एसआरपीएफ मधील 4 जवानांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना दवाखान्यातून सुट्टी देण्यात आली. कोरोना बाधित आढळल्यानंतर त्यांना वडसा येथील कोरोना केअर सेंटर मध्ये उपचारासाठी भरती करण्यात आले होते. त्यांनी आज कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना दहा दिवसानंतर दवाखान्यातून सोडण्यात आले.

*कोरोना बाबत गडचिरोली जिल्ह्यातील माहिती*

आज कोरोना बाधित – 00
आज एकूण कोरोनामुक्त-04
जिल्हयातील एकूण कोरोनामुक्त – 113
सद्या सक्रिय कोरोना बाधित- 92
मृत्यू – 01
एकुण बाधित – 206

मुलचेरा येथील मुख्याधिकारी यांच्या संपर्कातील तीव्र जोखमीच्या 66 व्यक्तींचे कोरोना अहवाल नकारात्मक

गेल्या आठवड्यात मुलचेरा नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांचा कोरोना अहवाल सकारात्मक आल्याने त्यांच्या संपर्कातील 20 जणांचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले. त्यापैकी दोन व्यक्तींचे कोरोना अहवाल सकारात्मक मिळाले. यामुळे या तिघांच्या एकूण संपर्कात आलेल्या इतर 66 लोकांचे नमुने तपासणीसाठी नागपूर प्रयोगशाळेत पाठवण्यात आले होते. त्यातील सर्व अहवाल नकारात्मक मिळाले आहेत. त्यामुळे प्रशासनाने वेळीच घेतलेल्या खबरदारी मुळे इतरांना संसर्ग होऊ शकला नाही असे आरोग्य विभागाने कळवले आहे. तरीही या सर्व संपर्कातील व्यक्तींना पुढील सात दिवस गृह विलगीकरणात राहणे अनिवार्य करण्यात आले आहे.