Muhammad – The Messenger of the God चित्रपटावर बंदीसाठी मा. बाळासाहेब आंबेडकर यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

 

सुनील उत्तमराव साळवे(९६३७६६१३७८)
कार्यकारी संपादक, दखल न्यूज भारत

मुंबई, – १८ जुलै २०२०
राज्यात कोरोनाच्या वाढत्या आकड्यांमुळे चिंतेचं वातावरण असतानाच राजकीय घडामोडींमुळे वातावरण तापलं आहे. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष मा. अॅड. प्रकाश ऊर्फ बाळासाहेब आंबेडकर यांनी वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री ना. उद्धवजी ठाकरे यांची भेट घेतली.
या बैठकीमध्ये अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी कोरोना आणि काही महत्त्वाच्या विषयांवर उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केली. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ‘मुहम्मद: द मैसेंजर ऑफ गॉड’ (Muhammad The Messenger of God) हा वादग्रस्त सिनेमा राज्यात बॅन केल्यानंतर आता देशातही बॅन व्हावा यासाठी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर आणि राज्याचे मुख्यमंञी मा. उद्धव ठाकरे यांच्यामध्ये चर्चा झाल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज रात्री पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी या संदर्भात चर्चा करणार आहेत. तसेच बकरी ईद आणि लॉकडाऊन दरम्यान वातावरण बिघडू नये यावरही महत्त्वाची चर्चा झाल्याचं सांगण्यात येत आहे.