कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांसाठी निशुल्क आयुर्वेदीय औषधांचे वितरण

122

 

मंगरुळपीर(फुलचंद भगत)-प.पु.सद्गुरु श्री विश्वनाथ महाराज रुकड़ीकर ट्रस्ट कोल्हापुर संचलीत श्री विश्ववती आयुर्वेद चिकित्सालय व संशोधन केंद्र कोल्हापुर संलग्न वाशिम येथील डॉ.परमात्मा ठाकरे (आयुर्वेदाचार्य)
वाशिम व रिसोड कोविड सेंटर वर कोविड पॉझिटीव्ह रुग्णांवर निशुल्क आयुर्वेद उपचार करत आहेत त्याप्रमाणेच मंगरुळपीर येथील डॉ.विट्ठल महाले (आयुर्वेदाचार्य) कारंजा व मंगरुळपीर कोविड सेंटर वर कोविड पोझिटिव्ह रुग्णांवर निशुल्क आयुर्वेद उपचार करत आहेत. या औषधोपचाराने कोविड पॉझिटीव्ह रुग्णांना खुप चांगल्या प्रकारे उपचार मिळत आहे असे रुग्णांकड़ुन प्रत्यक्ष फोनवरुन ऐकन्यास मिळत आहेत .भविष्यातही येणार्‍या सर्व रुग्णांना आयुर्वेदीय औषधे मोफत उपलब्ध करुन देणार असल्याची माहिती डॉ. विट्ठल महाले (आयुर्वेदाचार्य)यानी दिली. सोबतच कोविड सेंटर वर असलेले डॉ.अरविंद भगत,डॉ कोल्हे ,डॉ महाकाळ ,डॉ तिडके ,डॉ साळवे व नर्स, सफाई कामगार व सेंटर वरील सर्व कोविड योद्धे याना रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी मोफत “माधव रसायन ” विशेष संशोधित या आयुर्वेदीय औषधाचे वितरण करण्यात आले आहे.तसेच रोगप्रतीकार शक्ती वाढविण्यासाठी इछूकांनी आयुर्वेद डॉक्टरांशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

फुलचंद भगत
मंगरुळपीर/वाशिम
मो.8459273206