गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केले गुजर परिवाराचे मौदा येथे जाऊन केले सांत्वन

178

 

सुनील उत्तमराव साळवे(९६३७६६१३७८)
कार्यकारी संपादक, दखल न्यूज भारत नागपुर

मौदा / नागपुर:१८ जुलै २०२०
नागपूर जिल्हा राष्ट्वादी काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष शिवराज बाबा गुजर याचे वडील विजयकुमार गुजर यांचे नुकतेच वृद्धापकाळाने निधन झाले होते. त्यानिमित्ताने काल महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री ना.अनिलबाबू देशमुख यांनी मौदा येथील गुजरवाड्यातील निवासस्थानी जाऊन गुजर परिवाराचे सांत्वन केले.
यावेळी त्यांच्यासोबत विधान परिषद आमदार प्रकाश गजभिये काँग्रेस चे जेष्ठ नेते बाबुराव तिडके राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष आशिष पाटील, श्याम वाडीभस्मे, विजय पांडे, माजी नगरसेवक पृथ्वीराज गुजर, रामप्रसाद पराते, मौदा तहसीलदार प्रशांत सांगळे, पोलीस निरीक्षक मधुकर गिते उपस्थित होते. यावेळी मौदा तालुक्यात कोरोनाच्या बाबतीत केलेल्या उपाय योजनांची माहिती तहसीलदार प्रशांत सांगळे यांचेकडून जाणून घेतली.