तडफदार व सामाजिक कार्याची आवड असलेले, प्रामाणिक दमदार युवा जितेंद्र भाऊ मडावी यांची आरेवाडा शाखा प्रमुख पदी निवड.

163

 

सदाशिव माकडे (प्रतिनिधी)

(गडचिरोली जिल्हा)

भामरागड तालुक्यातील आरेवाडा येथील तडफदार, सामाजिक कार्यात सक्रिय असलेले गोरगरीबांच्य मदतीला धावणारे, प्रामाणिक दमदार युवा जितेंद्र भाऊ मडावी यांची शिवसेना शाखा प्रमुख पदी निवड करण्यात आली. सदर निवड मा. राजगोपाल भाऊ सल्वावार जिल्हा प्रमुख गडचिरोली यांच्या मार्गदर्शनाखाली, मा. रियाज भाई शेख उप जिल्हा प्रमुख, मा.धर्मराज राय, उप जिल्हा प्रमुख चामोर्शी, मा. अरूण भाऊ धुर्व्ह सर अहेरी विधानसभा प्रमुख, मा. दिलीप भाऊ सुरपाम अहेरी उप तालुका प्रमुख, मा. खुशाल मडावीजी शिवसेना भामरागड तालुका प्रमुख, यांच्या उपस्थतीमध्ये करण्यात आली.
शाखा प्रमुख पदी नियुक्ती झाल्या बद्दल जितेंद्र मडावी यांना शिवसेना जिल्हा गडचिरोली कडून हार्दिक अभिनंदन करीत पुढील कार्याकरिता शुभेच्छा देण्यात आल्या.