आम आदमी पार्टी पारशिवनी वाढीव विज बिल विरोधात तहासिलदार सहारे यांना दिले निवेदन

169

 

कमलसिह यादव
पाराशेवनी तालुका प्रातिनिधी
दखल न्यु भारत,नागपुर

पारशिवनी :– (ता प्र)दि17जुलै
आम आदमी पार्टीच्यावतीने वीज दरवाढीच्या विरोधात राज्यभरात ‘हिसाब दो’ मोहीम हाती घेतली आहे.
दुसरीकडे अव्वाच्या सव्वा आलेले वीजबिल आणि विजेच्या वाढीव दरवाढी विरोधात आप ने टप्प्याटप्प्याने अनेक आंदोलन केले. यापुढे आंदोलन तिव्र करन्याचा इशारा देण्यात आला आहे.
लॉकडाऊनमुळे होरपळलेल्या सामान्य नागरिकांना आता वीज दरवाढीचा शॉक राज्य सरकारने दिलेला आहे. या विरोधात मोहीम तीव्र करत नागरिकांना या दरवाढी विरोधात संघटित करून राज्य सरकार तसेच वीज नियामक मंडळापर्यंत त्यांच्या तक्रारी पोहोचवण्यासाठी ही मोहीम हाती घेण्यात आली आहे. वीज नियामक मंडळाला वाढीव वीज बिलांबाबत आता नागरिकांना घरबसल्या तक्रार करता येणार आहे. या माध्यमातून नागरिकांना दिल्ली व महाराष्ट्राच्या वीज बिल मधील तफावत समजून येणार आहे. या मोहिमेत अधिकाधिक नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
लॉकडाऊन काळातील ४ महिन्यांचे प्रति महिना २०० युनिट वीजबिल माफ करावे या साठी राज्य सरकारला निवेदन देण्यात आले आहे. या अन्यायकारक दरवाढी विरोधात अधिकाधिक नागरिकांनी या मोहिमेत सहभागी व्हावे. जोपर्यंत ही वीज दरवाढ मागे घेतली जात नाही, २०० युनिट बिल माफ केले जात नाही, तोपर्यंत आंदोलन सुरुच राहणार आहे.
असे मा.मुख्यमंत्री याना तहासिलदार वरुण कुमार सहारे पारशिवनी मार्फत पाठविलेल्या पञात आप चे जिल्हासचिव ईश्वर गजबे ,रामटेक विधान सभा क्षेत्र अध्यक्ष फजितराव कोरडे ,पारशिवनी तालुका अध्यक्ष श्याम खंडाळकर,गोपाल राजुरकर,शेषराव कोहळे, मधुकर भोयर, रामकृष्ण दखने ,गजानन नेवारे तसेच आप चे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.