बँकानी 3 दिवसात विहित नमुन्यात माहिती सादर करावी – अप्पर जिल्हाधिकारी टास्कफोर्स समितीची बैठक संपन्न

149

 

बिंबिसार शहारे(९५४५७७६३७८)
प्रतिनिधी दखल न्युज भारत

भंडारा, दि.17/07/2020:
जिल्हा सहकारी बँकेने दिलेले उद्दिष्य निर्धारित वेळेत पूर्ण केले असून ज्यांना उद्दिष्ट पूर्ण करता आले नाही त्यांनी पुन्हा प्रयत्न करावे तसे न झाल्यास खाते सहकारी बँकेत वळते करण्यात येईल. बँकांनी कामात टाळाटाळ करु नये तसेच शेतकऱ्यांना सौदाहर्याची वागणूक दयावी. जिल्हा उपनिबंधकांनी जो विहित नमुना दिलेला आहे. त्यात 3 दिवसात माहिती भरुन सादर करण्यायच्या सूचना अप्पर जिल्हाधिकारी यांनी दिल्या. राष्ट्रीयकृत बँक, ग्रामीण बँक, खाजगी बँकांचे उद्दिष्ट समाधानकारक नाही. सर्व बँकांनी 31 जुलै पर्यंत उद्दिष्टपूर्ती करावी, असे त्यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी कार्यालयात टास्कफोर्स समितीची बैठक अप्पर जिल्हाधिकारी घनश्याम भुगावकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. पालकमंत्री यांच्या निर्देशानुसार टासफोर्स समितीचे गठन करण्यात आले असून समितीचे अध्यक्ष अप्पर जिल्हाधिकारी आहेत. जिल्हा उपनिबंधक सदस्य सचिव मनोज देशकर असून सदस्य अग्रणी बँक व्यवस्थापक कुंभलवार आहेत.
या बैठकीत जिल्हयातील पिक कर्ज, महात्मा जोतिराव फुले कर्जमाफी योजना तसेच बँक निहाय उद्दिष्टयांचा आढावा घेण्यात आला. बैठकीस बँकांचे नोडल अधिकारी उपस्थित होते.