भाजपा सावलीची विविध मागण्यांची निदर्शने

सावली ..सुधाकर दुधे
कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे मागील तीन महिन्यापासून लॉक डाऊन सुरू आगहे त्यामुळे गोरगरीब जनतेच्या हाताला काम नाही परंतु वीज वितरण कंपनीने तीन महिन्याचे वीज बिल पाठवून गरीब जनतेचे कंबरडे मोडले आहे. त्यामुळे लोक डाऊन च्या काळातील वीजबिल माफ करण्यात यावे. अशी मागणी भारतीय जनता पार्टी सावली शाखा च्या वतीने तहसीलदार मार्फत मुख्यमंत्री यांच्याकडे करण्यातआली. जिल्ह्यात रमाई आवास योजनेअंतर्गत 14 हजार पेक्षा जास्त लाभार्थी असून ज्या लाभार्थ्यांना या योजनेचा निधी मिळाला नाही अशा लाभार्थ्यांना तातडीने निधी देण्यात यावा विद्यमान सरकारने कर्जमाफी जाहीर केली मात्र अनेक शेतकरी यापासून वंचित आहेत अनेक शेतकऱ्यांच्या पुनर्गठंण सुद्धा झाले नाही. त्यामुळे हंगामाच्या तोंडावर शेतकरी वर्ग हा हवालदिल झाला आहे शेतकऱ्यांच्या समस्या ह्या त्वरित निकाली काढण्यात यावा राजगृहावर झालेल्या हल्ल्याच्या निषेध नोंदवून हल्लेखोर समाजकंटकांवर त्वरित कारवाई करण्यात यावी व बाराबलुतेदार व गोरगरिबांना पॅकेज देण्यात यावे अशा विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदार मार्फत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांच्याकडे सादर करण्यात आले. यावेळी तालुका अध्यक्ष अविनाश पाल तालुका महामंत्री सतीश भाऊ पवार जिल्हा परिषद सदस्य संतोष तंगडपल्लीवार, शहराध्यक्ष आशिष कार्लेकर गुरुदास कोसरे अर्जुन भोयर अतुल लेनगुरे, गौरव संतोषवार समिती सदस्य गणपत कोठारे, राहुल लोडेल्लीवार, मयुर व्यास,मनोज अमोरजवर, मयुर गुरनुले, सुदर्शन चामलवर उपस्थित