रत्नागिरी जिल्ह्यात 60 नवे कोरोना पॉझिटिव्ह

0
144

 

प्रतिनिधी / निलेश आखाडे.

रत्नागिरी:- मागील 24 तासात प्राप्त अहवालांमध्ये जिल्ह्यात 60 नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 1 हजार 130 झाली आहे. आजपासून ॲन्टीजेन टेस्टला सुरुवात झाली असून यामध्ये एका रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. नव्याने सापडलेल्या रुग्णांमध्ये जिल्हा कोव्हीड रुग्णालय, रत्नागिरी येथील 11 रुग्ण, उपजिल्हा रुग्णालय, कामथे 18 रुग्ण, गुहागर 26 रुग्ण, दापोली 3, घरडा, खेड 1 (यामुळे घरडा केमिकल्स मधील एकूण पॉझिटिव्हची संख्या 82 झाली) आणि ॲन्टीजेन टेस्ट – 1 रुग्ण समावेश आहे. तर 17 रुग्णांना उपचारानंतर बरे झाल्यावर घरी सोडण्यात आले. यामुळे बरे झालेल्या रुग्णांची संख्या 682 झाली आहे.

दखल न्यूज भारत