नवेगाव-नागझिरा वन्यजीव अभ्यारण्याचे आरएएफओ शिंदेसह एक क्षेत्रसहायक तर एक वनरक्षक निलंबित

0
166

 

बिंबिसार शहारे(९५४५७७६३७८)
वि.जिल्हा प्रतिनिधी दखल न्युज

गोंदिया,दि.17/07/2020: नवेगांव-नागझिरा वन्यजीव अभयारण्याचे वनपरिक्षेत्राधिकारी सचिन नानासाहेब शिंदे यांना अभयारण्य चे अखाद्य वनस्पती निर्मुलन कामात ग्रामपारिस्थितिक विकास समिती बरोबर झालेल्या 2019-20 च्या आर्थिक व्यवहारात अनियमितता केल्याप्रकरणी निलंबित करण्यात आले आहे. यांच्यासोबत क्षेत्रसहाय्यक चरणलाल संपत बालपांडे व वनरक्षक कु.अश्विनी अशोकराव मुंडे यांनाही निलबिंत करण्याची कारवाई नवेगांव-नागझिरा टाइगर रिझर्व उपविभाग साकोलीच्या उपसंचालक पुनम पाटे यांनी ही कारवाई केलेली आहे.
आर्थिक वर्ष 2019-20 मध्ये नागझिरा वन्यजीव अभ्यारण्याता अखाद्य वनस्पती निर्मुलन काम ग्रामपरिस्थितीकीय विकास समिती बोळुंदा,कोडेबर्रा, थाड़ेझरी व घोटी येथे मजुरांद्वारे करण्यात आले होते.परंतु या कामात अनियमितता झाल्याची तक्रार तसेच मजुरांना अर्धवट मजुरी मिळाल्याची तक्रार विभागाला मिळाली होती.त्या तक्रारीच्या आधारे करण्यात आलेल्या चौकशीमध्ये वनपरिक्षेत्राधिकारी सचिन नानासाहेब शिंदे यांनी आर्थिक अनियमितता केल्याचे आढळून आले. तसेच त्यांना या कामात क्षेत्रसहायक चरणलाल संपत बालपांडे व वनरक्षक कु.अश्विनी अशोकराव मुंडे यांनी सहकार्य केल्याचे दिसून आल्याने त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करीत निलबिंत करण्यात आल्याचे प्रसिध्दीपत्रकाद्वारे कु.पाटे यांनी कळविले आहे.