वियानी विद्या मंदिर शाळेचा निकाल शंभर टक्के 

प्रशांत चरड़े,
चंद्रपुर जिल्हा प्रतिनिधि,
घुग्घुस येथील वियानी विद्या मंदिर शाळेनी आयसीएसी 10 वी बोर्डाच्या परीक्षेत शंभर टक्के यश प्राप्त केले.वियानी विद्या मंदिर या शाळेत दहावी ची परीक्षा घेण्यात आली होती. या शाळेचे 70 विध्यार्थी परीक्षेला बसले होते यापैकी 70 विध्यार्थी पास होऊन शाळेने शंभर टक्के निकाल दिला .यात 94 टक्के गुण घेऊन आस्था पाझारे या विद्यार्थीनीने प्रथम क्रमांक पटकाविला, आदिती भवसार 93.80 टक्के गुण घेऊन दुसरा क्रमांक व रिया मांदणारे 93.30 टक्के गुण घेऊन तिसरा क्रमांक पटकाविला हे विध्यार्थी बाराव्या बॅच चे होते या यशाबद्दल शाळेचे फादर रॉबर्ट निकोलस,उपप्राचार्य सिस्टर शैली व शाळेतील शिक्षकां द्वारे या विध्यार्थ्यांनचे अभिनंदन करण्यात आले आहे .