चाळीस वर्षीय इसमाकडून 14 वर्षाच्या बालिकेचा पाठलाग, लाखनवाडी येथील घटना

225

दर्यापूर(तालुका प्रतिनिधी,युवराज डोंगरे)
40 वर्षीय इसमाने 14 वर्षीय बालिकेचा पाठलाग करुन हात पकडल्याची घटना दर्यापूर तालुक्यातील खल्लार पो स्टे हद्दीतील लाखनवाडी येथे दि 15जुलैला सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास घडली
खल्लार पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार लाखनवाडी येथील 14 वर्षीय बालिका हि तिच्या चार वर्षाच्या बहिनीसह आजीच्या घरी जात असताना कोकरडा प्राथमिक आरोग्य केंद्राजवळ आरोपी गोपाल रमेश सरकटे वय 40वर्ष याने बालिकेचा पाठलाग करुन हात पकडला सदर बालिकेने त्याच्या हाताला झटका देऊन पळ काढला पळ काढल्यानंतर आरोपीने तिचा पाठलाग केला त्यामुळे बालिकेने रस्त्यावरील दगड त्याला फेकून मारला
याप्रकरणाची तक्रार खल्लार पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आली असून आरोपीविरुद्ध बाललैगिक अत्याचार कायदा अन्वये अप न135/20 कलम 354 (अ)सहकलम 354(ड)नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक आशिष गंद्रे करीत आहेत