राष्ट्रीय कराटे पटु -गोल्डन गर्ल ऑफ चंद्रपूर कु आर्थिका अनुसंजय उपाध्ये ची cbse परीक्षेत 87% गुण घेत उत्तम कामगिरी

229

प्रशांत चरड़े,
चंद्रपुर जिल्हा प्रतिनिधि,
नुकत्याच जाहीर झालेल्या केंद्रीय माध्यमिक शिक्षा बोर्ड ( cbse) च्या 10 वी च्या परीक्षेत हिंदी विषयात 97 तसेच इंग्रजी मध्ये 96 गुण घेतले आहेत.वर्षभर राज्य तसेच राष्ट्रीय स्तरावर कराटे क्रीडा प्रकारात ,सांस्कृतिक कार्यक्रम,विज्ञान प्रदर्शनी,चित्रकला सोबतच सर्वच क्षेत्रात सहभाग घेऊन विद्यालय आणि घुग्घुस गावाचे नाव उज्वल केले आहे.कुठल्याही प्रकारची शिकवणी वर्ग,क्रॅश कोर्स न लावता केवळ विद्यालयातील शिक्षक वृंदाच्या मार्गदर्शनाने तिने ही कामगिरी केली आहे.कराटेतील प्रसिद्ध ब्लॅक बेल्टपर्यंत पोहोचलेल्या आर्थिका ने अत्यंत परिश्रम करून हे यश सम्पादन केले आहे.आपल्या यशाचे श्रेय तिने विद्यालयाची प्राचार्या सिस्टर प्रीता,सर्व शिक्षक वृंद आणि आईबाबांना दिले आहे.