Home कोकण प्रशासक नियुक्ती ऐवजी कमी लोकसंख्येच्या गावांमध्ये ग्रा. प. निवडणूका घ्याव्यात-सुहास खंडागळे ...

प्रशासक नियुक्ती ऐवजी कमी लोकसंख्येच्या गावांमध्ये ग्रा. प. निवडणूका घ्याव्यात-सुहास खंडागळे गाव विकास समिती,रत्नागिरी जिल्हा संघटना करणार सरकार व निवडणूक आयोगाकडे मागणी

157

 

जिल्हा प्रतिनिधी / निलेश आखाडे.

रत्नागिरी:-प्रशासक नियुक्ती बाबत वेगवेगळे मतप्रवाह समोर येत असतानाच गाव विकास समितीचे संघटन प्रमुख सुहास खंडागळे यांनी कमी लोकसंख्या असणाऱ्या गावांमध्ये योग्य ती खबरदारी घेऊन ग्रा.पंचायत निवडणुका घ्याव्यात अशी भूमिका मांडली आहे,तशी मागणी गाव विकास समिती मार्फत राज्य सरकार व निवडणूक आयोगाकडे केली जाणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
मुदत संपणाऱ्या ग्राम पंचायतीवर प्रशासक नेमण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.मात्र हा प्रशासक पदावर असताना निरंकुश पणे कारभार करण्याची शक्यता अधिक आहे,किंवा त्या प्रशासकाला राजकीय पार्श्वभूमी असल्यास त्याला राजकीय नेतृत्वाकडून मिळणाऱ्या सूचना प्रमाणे तो काम करण्याची शक्यता नाकारता येणार नाही.ग्राम पंचायत सरपंचावर इतर सदस्यांचा अंकुश असतो,शिवाय ग्राम पंचायत सदस्य हे जनतेने निवडून दिलेले असतात.मात्र प्रशासक कडून मनमानी भूमिका घेतली जाण्याची शक्यता आहे.दुसरी बाब म्हणजे गावांची भौगोलिक स्थिती लक्षात घेऊन कमी लोकसंख्या असणाऱ्या गावांत वाडी निहाय मतदान यंत्रणा सक्षम करून निवडणूक घेणे शक्य आहे.टप्याटप्याने निवडणूक कार्यक्रमाची अंमलबजावणी करता येईल का?याचा विचार होणे गरजेचे असल्याचे खंडागळे यांनी म्हटले आहे.गावपातळीवर फिजिकल डिस्टन्स पाळणे गावात सहज सोपे आहे.आता कोरोना काळात ही गावगाडा हा सुरूच आहे,गावची लोकं योग्य ती खबरदारी घेत आहेत त्यामुळे कमी लोकसंख्या असणाऱ्या ग्रामपंचायत ची निवडणूक घेण्या बाबत सरकार आणि निवडणूक आयोगाने विचार करावा अशी भूमिका गाव विकास समितीचे संघटन प्रमुख सुहास खंडागळे यांनी मांडली आहे.

*दखल न्यूज भारत*

Previous articleकोरोना प्रतिबंधक उपकरणे, साधने व किट यांचे शासकीय दरपत्रक निश्चित करण्याबाबत विभागीय आयुक्तांना निवेदन, नितीन वाघ खडकवासला विधानसभा मतदारसंघ प्रमुख शिवसेना.
Next articleविक्की तेलगोटे यांच्या वाढदिवस निमित अकोट शहर पोलीस स्टेशन मध्ये मास्क वाटप