प्रधानमंत्री पीक विमा योजनाचा लाभ घ्या तालुका कृषीअधिकारी शांताराम शनिवार याचे आवाहन

147

अशोक खंडारे विभागीय प्रतिनिधी
साध्य जगभरात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव असल्याने इतर व्यवसाय पेक्षा शेती करणे अधिक चांगले आहे आणि सध्याचा वातावरण शेतीला पोषक आहे.त्यामुळे खरीप 2020 मध्ये भामरागड तालुक्यातील बहुतांश लोक तसेच कर्मचारी वर्गही मोठया प्रमाणात शेती करीत आहेत यासाठी पिकाला सुरक्षा मिळावी या उद्देशाने प्रधानमंत्री पीक विमा योजना लागू करण्यात आली असून तालुक्यातील सर्व कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन तालुका कृषी अधिकारी शांताराम शनिवार यांनी केले आहे.
31 जुलै 2020 पर्यंत या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करता येईल तालुक्यातील शेतकऱ्यांनी आपला अर्ज बँक महा ई सेवा केंद्र.सि एस सी केंद्राच्या माध्यमातून शासनाच्या संकेतस्थळावर सादर करावा,तालुक्यात धनासाठी विम्याचा प्रति हेक्टर विम्याचा दर 625
असून 31 हजार 250इतकी विमा सुरक्षा रक्कम आहे मागच्या वर्षी भामरागड तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांना प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा लाभ मिळाला होता त्यामुळे यावर्षी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यवा असे आवाहन प्रभारी तालुका कृषी अधिकारी शांताराम शनिवार व सुपरवायजर जे.डी. मसराम यांनी केले आहे