वणीत आज आणखी एक पॉजिटिव्ह रुग्ण आढळला, रुग्णांची संख्या झाली 20, कोरोना मुक्त 11तर पाँझिटिव्ह अँक्टिव्ह व्यक्ती 9

 

वणी : परशुराम पोटे

परसोडा कोविड केअर सेन्टर मध्ये भर्ती असलेली एक व्यक्ती पाँझिटिव्ह निघाल्याने आता वणीत रुग्ण संख्या 20 झाली अाहे. या 20 रुग्णापैकी कोरोना मुक्त 11 तर अँक्टिव्ह पाँझिटिव्ह व्यक्ती 9 आहेत.
येथिल परसोडा कोविड केअर सेन्टर ला 26 रँपिड टेस्ट करण्यात आल्या त्यापैकी ईतर 6 व दि.16 जुलैला पाँझिटिव्ह व्यक्तीच्या हाय रिक्स काँन्टँक्ट 20 व्यक्ती यांची टेस्ट करण्यात आले. त्यामध्ये आज दि.17 जुलैला एक महिला पाँझिटिव्ह आली. व उर्वरित 25 निगेटिव्ह आहे. आजची पाँझिटिव्ह व्यक्ती हि कोविड केअर सेंन्टर ला भरती होती. तिचे काँन्टँक्ट ट्रेसिंग करण्यात येत आहे. एकुन पाँझिटिव्ह व्यक्ती 20 कोरोना मुक्त 11 तर सद्या अँक्टिव्ह पाँझिटिव्ह रुग्ण संख्या 9 आहे.