बी. एन. एन. महाविद्यालयातील धिरज तारेची चमकदार कामगिरी बारावीच्या परीक्षेत धिरज तारे यास ८६.२० टक्के गुण सनदी लेखापाल होण्याचा मानस

551

 

दिलीप अहिनवे
मुलुंड मुंबई उपनगर प्रतिनिधी
दखल न्युज भारत
मो. 9323548658

भिवंडी, दि. १७ : ठाणे जिल्ह्यातील भिवंडी निजामपूर शहर महापालिका हद्दीत अग्रगण्य बी. एन. एन. महाविद्यालय आहे. नुकताच बारावीचा निकाल जाहीर झाला. वाणिज्य शाखेत शिकणारा गुणी विद्यार्थी धिरज प्रकाश तारे याने ८६.२० गुण मिळवुन नेत्रदीपक यश संपादन केले आहे. धिरजच्या यशात त्याचे शिक्षक अनघा भोईर व यशवंत अहिरे यांचा मोलाचा वाटा आहे. आई योजना व वडील प्रकाश यांचा नेहमी सकारात्मक पाठिंबा त्याला मिळत आहे. एस. एस. सी. परीक्षेत त्याने ९५.८० टक्के गुण मिळवुन दैदिप्यमान यश मिळवले होते.

शालेय जीवनापासून कुस्ती, कबड्डी व लंगडी खेळात त्याने अनेक स्पर्धात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. चार पाच वर्षांपुर्वी भिवंडीतील गोवे गावात झालेल्या विभागीय शासकीय कुस्ती स्पर्धेत त्याने तृतीय क्रमांक पटकावला होता. सांस्कृतिक कार्यक्रमात देखील तो आवडीने सहभागी व्हायचा. महाविद्यालयात दाखल झाल्यावर अभ्यासावर जास्त लक्ष केंद्रित करण्यावर भर दिला.

भविष्यात सनदी लेखापाल (सी. ए.) होण्याचा मानस आहे. लॉकडाऊन कालावधीत सी. ए. फाऊंडेशन कोर्सचा आॅनलाईन अभ्यास सुरु आहे. सतत हसतमुख चेहरा व जिद्दीच्या जोरावरच त्याने हे यश खेचून आणले आहे.

मुंबई महापालिका शिक्षण विभाग अंतर्गत नगरबाह्य धामणगाव मनपा शाळेत त्याने प्राथमिक शिक्षण घेतले. तेथेच त्याची गुणवत्ता दिसून येत होती. सर्व शिक्षकांनी भाकित केले होते की, “धिरज खुप मोठा होणार व आपल्या महापालिका शाळेचे नाव उज्वल करणार.” त्याच दिशेने त्याची पावले पडत आहेत.

धिरजच्या या अप्रतिम यशामुळे सर्व स्तरातुन त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. पद्मश्री अण्णासाहेब जाधव (भा. उ. शि. मं.) संस्थेचे संस्थाध्यक्ष विजय जाधव, कार्याध्यक्ष बाळकृष्ण काळे, प्राचार्य डॉ. अशोक वाघ, प्राध्यापक, क्रीडा शिक्षक गुणवंत बेलखेडे, मुंबई महानगरपालिका मुलुंड ‘टी’ विभागाचे कनिष्ठ पर्यवेक्षक शिवदत्त कोठेकर, ठाणे जिल्हा कुस्ती संघटक प्रा. श्रीराम पाटील, सरवलीचे शिवसेना पदाधिकारी किशोर चौधरी, धामणगाव मनपा शाळेच्या वरिष्ठ शिक्षिका शुभांगी चौधरी, पत्रकार दिलीप अहिनवे, रणजीत भोईर व राकेश सर यांनी धिरज व त्याचे आई-वडील यांचे अभिनंदन करुन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.