नाटेकर ,गांधी ,कीर कनिष्ठ महाविद्यालयाची एच. एस. सी.उज्ज्वल निकालाची परंपरा कायम.

132

 

प्रतिनिधी / गौरव मुळ्ये.

रत्नागिरी दिनांक 16 जुलै: भारत शिक्षण मंडळ संचलित, पटवर्धन हायस्कूल, विजू नाटेकर कला , कै.सौ.विजयालक्ष्मी श्रीकृष्ण गांधी वाणिज्य व श्रीमान रमेशजी किर विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय रत्नागिरी यांचा दरवर्षीप्रमाणे एच.एस. सी चा निकाल उज्वल यशाची परंपरा कायम राखत उत्तम लागलेला आहे.यामध्ये विज्ञान शाखेचा निकाल 100 टक्के वाणिज्य शाखेचा निकाल 98. 75 टक्के तर कला शाखेचा निकाल 92 टक्के लागला असून सदर निकालांमध्ये कला शाखेमध्ये सानिका समीर कदम 86 . 51%, स्वप्नील संतोष मोहिते 72%, सानिका किशोर साळवी 70 टक्के ,सिद्धी संतोष सुर्वे 70 टक्के, कुमारी प्रगती प्रकाश लोंढे 69% मिळवून गुणानुक्रमे क्रमवारीत पहिले आलेत. वाणिज्य शाखेमध्ये कुमारी .करीना प्रकाश तुळसणकर हिने 88% शारदा ठाकराराम चौधरी 86% ,सेजल रामदास मयेकर 80% ,अनामिका पांडुरंग वझे 80% ,कु.निकिता दीपक बोरकर 76 टक्के, पूजा दत्ताराम मांडवकर 75%, मैथिली संदीप बोरकर 75% गुणानुक्रमे पहिले आलेत. विज्ञान विभागात राज विकास शिवलकर 68 . 77 टक्के, शुभम शिवलोचन मौर्य 68. 40%, युवराज रमाकांत करंडे 66 .15 टक्के, ऋतुजा उमेश चव्हाण 64, श्रीलेश चंद्रशेखर शिंदे 63. 38 टक्के मिळवून गुणानुक्रमे पहिले आलेत.सर्व विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे भारत शिक्षण मंडळाचे पदाधिकारी कार्यवाह श्री सुनिल उर्फ दादा वणजू, कार्याध्यक्ष श्री नंदकुमार साळवी, उपकार्याध्यक्ष श्री श्रीराम भावे, सहकार्यवाह श्री विनय परांजपे, पदाधिकारी श्री संजय जोशी, श्री नचिकेत जोशी,खजिनदार चंद्रकांत घवाळी ,वरिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य सीएमए प्रा उदय बोडस कनिष्ठ महाविदयालयाच्या वाणिज्य शाखेचे देणगीदार श्री शशांक गांधी,विज्ञान विभागाचे देणगीदार सौ नमिता कीर, कला शाखेचे देणगीदार नाटेकर कुटुंबीय तसेच संस्थेचे सर्व पदाधिकारी यांच्याकडून कौतुक होत आहे. पटवर्धन हायस्कूल चे मुख्याध्यापक श्री राजेंद्र कांबळे यांनी सर्व शिक्षक व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. पटवर्धन हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. महाविद्यालयाची परंपरा पाहता अनेक विद्यार्थ्यांना आवाहन करण्यात येते की आमच्या वरिष्ठ व कनिष्ठ महाविद्यालयात आपण प्रवेश घ्यावा. शिक्षकांचे उत्तम मार्गदर्शन व विद्यार्थ्यांचा तेवढाच चांगला प्रतिसाद यामुळे यशाची ही परंपरा कायम राखण्यात पटवर्धन हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय यशस्वी ठरलेले आहे. पर्यवेक्षक श्री मनोज जाधव, सौ. वर्षा जोशी , सौ गीता कनगुटकर, सौ प्राजक्ता कुलकर्णी, सौ वृंदाली गुरव, सौ दीपिका कुलकर्णी, सौ शुभांगी शिंदे, सौ मानसी चव्हाण, सौ शलाका वर्तक, सौ.शितल रोकडे, ऋषाली घाणेकर,कल्पना नागवेकर, सौ. संध्या बेटकर ,श्री. तानाजी वाघमारे श्री.दत्ताञय मांजरेकर, शबनम तहसीलदार सौ योगिनी भागवत , पर्यवेक्षक श्री. सत्यवान कोञे,श्री आर्डे इत्यादी शिक्षकांच्या सहकार्यामुळे उत्तम यश लाभले.

दखल न्यूज भारत