चंद्रपुर भाजपा जिल्हाअध्यक्ष देवराव भोंगळे यांचे विविध मागण्यासाठी आंदोलन घुग्घुस येथील गांधी चौकात भाजपा तर्फे विज बिलाची दुस-यांदा होळी

200

प्रशांत चरड़े,
चंद्रपुर जिल्हा प्रतिनिधि,
दिनांक १७ जुलै रोजी सकाळी १२ वाजता घुग्घुस येथील गांधी चौकात भाजपाच्या वतिने गोरगरिबांचे विज बिल माफ करने, शेतक-यांचे कर्ज माफ करने व खतांचा पुरवठा करने, रमाई आवास योजनेचे पैसे देने, बारा बलुतेदार व गरिबांना पॅकेज देने, राजगॄहातील हल्लेखोरांवर कठोर कारवाही करने अश्या विविध मागण्याकरीता आंदोलन करण्यात आले अश्या प्रकारचे आंदोलन चंद्रपुर जिल्हयातील प्रत्येक गावा गावात करण्यात आले. आणी दुस-यांदा विज बिलाची होळी करण्यात आली. यापुर्वी ३ जुलैला गांधी चौकात भाजपा च्या वतिने विज बिलाची होळी करण्यात आली होती व आघाड़ी सरकारचा निषेध करण्यात आला होता.
कोरोना काळात विज वितरण कंपनीने सरासरी विज बिल ग्राहकांना दिले. त्यामुळे राज्य भरातील जनतेत असंतोष निर्माण झाला. भरमसाठ विज बिल घरगुती ग्राहकांना दिल्याने अडचणीचा सामना करावा लागत आहे. चंद्रपुर जिल्ह्यात रमाई आवास योजनेचे दलित बांधवांना १४ हजारांच्या वर घरकुल मंजुर झाले आहे परंतु राज्य सरकार पैसे देत नसल्याने घर बांधण्याचे स्वप्न पुर्ण करु शकत नाही. शेतक-यांची कर्जमुक्ती झाली, पाहीजे बारा बलुतेदारांना पॅकेज जाहिर केले पाहिजे, राजगॄहातील हल्लेखोरांवर कठोर कारवाही केली पाहिजे, अशी मागणी घुग्घुस भाजपा च्या वतिने करण्यात आली आहे.
मागण्यापुर्ण न केल्यास यापुढे तिव्र आंदोलन करण्यात येनार असा इशारा चंद्रपुर भाजपा जिल्हाअध्यक्ष देवराव भोंगळे यांनी आंदोलना दरम्यान दिला आहे. यावेळी आघाडी सरकार विरुद्ध प्रचंड नारेबाजी व घोषणा बाजी करण्यात आली.
याप्रसंगी चंद्रपुर भाजपा जिल्हाअध्यक्ष देवराव भोंगळे, घुग्घुस भाजपा शहराध्यक्ष विवेक बोढे, जिप सभापती नितु चौधरी ,चंद्रपुर पंस उपसभापती निरिक्षण तांड्रा, प्रभारी सरपंच संतोष नुने, ग्रामपंचायत सदस्य प्रकाश बोबडे, साजन गोहने,संजय तिवारी, भाजपा नेते संजय भोंगळे, अनिल मंत्रीवार, बबलु सातपुते, दिलीप कांबळे, अमोल थेरे, प्रविण सोदारी,रज्जाक शेख, इम्तीयाज अहमद, विनोद जिंजर्ला, गुड्डु तिवारी ,भाजपा महिला आघाडीच्या , चंद्रकला मन्ने, माया मांडवकर, जनाबाई निमकर, ज्योती कंडे, सिंधु डाफ, लिला पचारे, सुनिता चिप्पावार,लिला डुकरे, गुरुदेव सेवा मंडळाचे मधुकर मालेकर भाजपा पदाधिकारी व इतर असंख्य कार्यकर्त्ये उपस्थित होते.