घुग्घुस काँग्रेस तर्फे गूणवंत विद्यार्थ्यांचे सत्कार राजूरेड्डी यांचे तर्फे विद्यार्थ्यांना हव्या त्या मदतीची हमी

प्रशांत चरड़े,
चंद्रपुर जिल्हा प्रतिनिधि,
राज्यात 10 वी व 12 वीचे परीक्षा निकाल नुकतेच जाहीर झाले असून यात मुलीनी आपल्या मेहनत, जिद्द, चिकाटी, मुळे यश संपादन केले असून आपल्या कुटुंबियांना ही गौरव प्राप्त करून दिला आहे.
या विद्यार्थ्यांना अभिनंदन करण्या करिता त्यांच्या पुढील जीवनातील वाटचालीस शुभेच्छा देण्यासाठी दिनांक 17 जुलै रोजी घुग्घुस काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजूरेड्डी यांच्यातर्फे गांधीनगर वसाहतीतील नारायणा विद्यालयातील 12 वी वर्गाची विद्यार्थिनी कु. सदफ मेराज अहमद अंसारी जीने 94% गुण प्राप्त केले असून ही विद्यार्थीनी कधी ही शिकवणी वर्गाला गेली नाही तर घरी राहूनच अभ्यास करून हे कौशल्य प्राप्त केले आहे. तर नौशीन फिरोज खान पठाण या वियानी शाळेत 10 व्या वर्गात शिकणाऱ्या मुलीने 88% गुण मिळविले आहे.
तसेच धानोरा येथिल जनता महाविद्यालयात शिक्षण घेणारी शेतकरी कुटुंबातील कु.मेघा विलास जुनघरे या मुलीने 83% गुण घेतले असून या सर्वांना पुष्पगुच्छ व मिठाई देऊन त्यांचे अभिनंदन करण्यात आले व पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.
याप्रसंगी कामगार नेते सय्यद अनवर, विशाल मादर, सचिन कोंडावार, रोशन दंतलवार, नुरुल सिद्दीकी, आरिफ शेख, देवानंद ठाकरे उपस्थित होते. विद्यार्थ्यांना जीवनात कुठलीच समस्या आल्यास व गरज पडल्यास आपल्याशी संपर्क करावा असे आवाहन राजूरेड्डी यांनी याप्रसंगी विद्यार्थ्यांना केला