कोरोनामूळे निर्माण झालेला रक्ताचा तुटवडा लक्षात घेता भरुन काढण्यासाठी यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन

प्रशांत चरड़े,
चंद्रपुर जिल्हा प्रतिनिधि,

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाच्या वतीने आखण्यात आलेल्या उपाय योजनांचा फटका रक्तपेठयानांही बसला आहे. जिल्ह्यात रक्तदात्यांची संख्या कमी झाल्याने रक्ताचा तूटवडा निर्माण झाला आहे. तो भरुन काढण्यासाठी रक्तदान करण्याचे आवाहण आमदार किशोर जोरगेवार यांनी केले होते. त्यानंतर आज गुरुवारी यंग चांदा ब्रिगेडच्या महिला आघाडीच्या वतीने रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले.
सध्या कोरोनामूळे लागू करण्यात आलेल्या संचारबंदीत ब-या प्रमाणात शिथीलता देण्यात आली होती. मात्र कोरोना रुग्णांचा वाढता आलेख लक्षात घेता आता पून्हा एकदा चंद्रपूर लॉकडाऊन करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. यातच सलग तिन महिणे जिल्हा टाळेबंदी राहिल्याने याचा परिणाम सर्व सामान्यांवरच झाला असे नाही तर या टाळेबंदीचा परिणाम जिल्ह्यातील रक्तपेठयांवरही झाल्याचे दिसून येत आहे. कोरोना काळात रक्तदात्यांनी रक्तदानाकडे तुर्तास तरी पाठ फिरविल्याचे दिसून येत आहे. तसेच रक्तदानाचे कार्यक्रमाही बंद असल्याने याचा मोठा परिणाम रक्तपेठयांवर झाला आहे. हि बाब लक्षात नागरिकांनी रक्तदानासाठी पूढे येण्याचे आवाहण आमदार किशोर जोरगेवार यांनी केले होते. दरम्याण आज यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने आमदार किशोर जोरगेवार यांच्या जनसंपर्क कार्यालयात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरामध्ये रक्तदात्यांनी सहभाग घेत रक्तदान हेच खरे श्रेष्ठदान असल्याचा संदेश दिला. यंग चांदा ब्रिगेडच्या महिला आघाडीच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी, विमल काटकर, भाग्यश्री हांडे, वैशाली मेश्राम, कल्पना शिंदे, दुर्गा वैरागडे, आरती आगलावे, वैशाली रामटेके, सरिता चेक्कपूलवार, वैशाली मद्दीवार, आदिंनी परिश्रम घेतले.