Home महाराष्ट्र श्रावणातही मार्लेश्वर मंदिर राहणार बंद.

श्रावणातही मार्लेश्वर मंदिर राहणार बंद.

148

 

प्रतिनिधी / प्रसाद गांधी.

संगमेश्वर – श्रावण मासात मार्लेश्वर मंदिरात मोठ्या प्रमाणावर गर्दी होते. पण, कोरोनामुळे मात्र या ठिकाणी येण्यास भाविकांना बंदी आहे. परिणामी आता इथला व्यवसाय बुडाला असून लाखो रुपयांच्या उलाढालींवरही परिणाम झाला आहे. मंगळवार २१ जुलै रोजी श्रावण मास सुरु होत असून या कालावधीत प्रथमच मार्लेश्वर भक्तांना दर्शनापासून अलिप्त रहावे लागणार असल्याने भक्तगणांमध्ये कमालीची नाराजी पसरली आहे .
आता चार दिवसांवर आलेल्या श्रावणी सोमवारवर देखील कोरोनाचा परिणाम दिसून येणार आहे. श्रावणातील सोमवार म्हटलं की, भाविक मोठ्या प्रमाणात शंभू महादेवाच्या मंदिरात जाऊन दर्शन घेतात. पण, यंदा मात्र भाविकांना त्याठिकाणी जाता येणार नाही आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील मार्लेश्वर हे प्रसिद्ध देवस्थान. महादेवाचं स्वयंभू असं तीर्थक्षेत्र असलेल्या मार्लेश्वरमध्ये श्रावणात मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी होते. राज्याच्या कानाकोपऱ्यातून या ठिकाणी भाविक येतात. पण, यंदा मात्र भाविकांना या ठिकाणी येता येणार नाही. कोरोनामुळे देशातील देवस्थाने बंद आहेत. त्यानुसार रत्नागिरी जिल्ह्यातील देवरुख जवळील मार्लेश्वर हे देवस्थान भक्तांसाठी बंद आहे. या ठिकाणी दररोज शंभू महादेवाची पूजा आणि आरती मात्र नित्य होत आहे. पण, भाविकांची होणारी गर्दी मात्र थांबली आहे. जिल्हाधिकारी आणि न्यास याबाबत निर्णय घेत नाहीत तोपर्यंत हे देवस्थान भक्तांना दर्शनासाठी खुलं करता येणार नसल्याची माहिती तिथल्या पुजाऱ्यांनी दिली आहे.

दखल न्यूज भारत

Previous articleज्यूनिअर वकिलांना आर्थिक मदत सहानुभूतीने करु – उदय सामंत
Next articleप्रा दामोदर झाडे यांना आचार्य पदवि बहाल