ज्यूनिअर वकिलांना आर्थिक मदत सहानुभूतीने करु – उदय सामंत

 

प्रतिनिधी / निलेश आखाडे.

रत्नागिरी – करोनाच्या गंभीर समस्येमुळे महाराष्ट्रातील बहुतेक न्यायालये लॉकडाऊनमुळे 22 मार्चपासून बंद आहेत. न्यायालयाचे कामकाज बंद झाल्याने महाराष्ट्रातील पाच वर्षे ज्युनिअर असलेल्या 28547 वकिलांना आर्थिक प्रश्नांना सामोरे जावे लागत आहे. यासाठी रत्नागिरीतील जेष्ठ वकील ॲड. विलास पाटणे, ॲड. अशोक कदम व ॲड. विजय साखळकर यांनी उच्च व तंत्रशिक्षणमंत्री मंत्री ना. उदय सामंत यांची भेट घेतली. त्यावेळी सामंत यांनी तात्काळ सर्व विषय मुख्यमंत्री मा. उद्धवजी ठाकरे यांचेशी चर्चा करुन सहानुभूतीपूर्वक मार्ग काढू असे आश्वासन दिले.
कर्नाटक सरकारने त्यांच्या राज्यातील वकिलांना 5 कोटींचा आर्थिक सहाय्य केले आहे. महाराष्ट्रातील ज्युनियर वकिलांची दुप्पटीने संख्या लक्षात किमान रु. दहा कोटी रक्कम राज्यातील 112706 वकीलांचे नेतृत्व करणाऱ्या बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्रकडे दिल्यास ज्युनिअर वकील व क्लार्क यांना आर्थिक सहाय्य करणे सोयीचे होईल. खास. विनायक राऊत तसेच बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्राचे सदस्य मा. अँड पारिजात पांडे, अँड संग्राम देसायी ,अँड .गजानन चव्हाण ,अँड. मिलींद पाटील व ॲड. उदय वारुंजीकर प्रयत्न करीत आहेत अशी माहिती ॲड. विलास पाटणे यांनी दिली आहे.

*दखल न्यूज भारत*