देवरूख ग्रामीण रुग्णालयाला मिळणार आयसीयू रुग्णवाहिका, आमदार शेखर निकम यांच्या निधीतून मंजुरी

 

प्रतिनिधी / प्रफुल्ल रेळेकर.

देवरुख: आमदार शेखर निकम यांच्या स्थानिक विकास कार्यक्रमातून देवरूख ग्रामीण रुग्णालयासाठी अत्याधुनिक आयसीयू रुग्णवाहिका खरेदी करण्यासाठी अंदाजपत्रक तयार करावे, अशी सूचना जिल्हा नियोजन अधिकारी सुभाष झुंजारे यांनी जिल्हा शल्य चिकित्सक यांना दिले आहेत. यामुळे आ. निकम यांच्या प्रयत्नातून ग्रामीण रुग्णालयाला लवकरच आयसीयू रुग्णवाहिका उपलब्ध होणार आहे, तसेच याच निधीतून चिपळूण व संगमेश्वर तालुक्यासाठी आरोग्य विभागाकरता ऑक्सो मीटर खरेदी करावेत, अशी मागणीही निकम यांनी केली आहे. याचेही अंदाजपत्रक सादर करण्याबाबत जिल्हा नियोजन अधिकाऱ्यांनी सूचना दिल्या आहेत. त्यामुळे चिपळूण व संगमेश्वर या दोन तालुक्यांसाठी १०० ऑक्सो मीटर लवकरच उपलब्ध होतील. दोन दिवसांपूर्वीच आमदार शेखर निकम यांच्या निधीतून इन्फ्रा टेंपरेचर मंजूर झाले आहेत. चिपळूणसाठी ७ व संगमेश्वरसाठी ५ असे हे इन्फ्रा टेंपरेचर मीटर आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मतदार संघातील आरोग्य सुविधा सक्षम करण्यावर आमदार शेखर निकम यांचा अधिक भर असल्याचे दिसून येत आहे.
दखल न्यूज भारत