यवतमाळ शहरातील सर्वात लहान COVID – 19 कोरोना योद्धा बनली काश्यपी

0
109

 

प्रतिनिधी:रोहन आदेवार

यवतमाळ: यवतमाळ येथील उज्वल नगर मध्ये राहणारे विनोद दोंदल यांची नऊ वर्षाची कन्या काश्यपी कोणत्या ना कोणत्या सामाजिक कार्यात आपला सहभाग नोंदवत असते, वृक्षरोपण करणे, गोरगरीब भुकेल्या लोकांना जेवन देणे, मतिमंद मुलांन बरोबर रक्षाबंधन व वाढदिवस साजरा करणे, दिवाळीच्या सणाला गरीब लोकांना फळाची पदार्थ वाटणे, कपडे वाटप करणे, शीडबॉल तयार करून शहराच्या आजूबाजूच्या जंगलात फेकणे इत्यादी असे एक ना अनेक समाज उपयोगी कार्यात सहभाग नोंदवून लहान वयात करून संपूर्ण शहरात नावलौकिक मिळवले आहे
सद्या संपूर्ण जगात व आपल्या देशात कोरोना व्हायरस रोगाने थैमान घातले आहे, लॉकडाऊन काळात गरीब रोजनदारीने काम करणाऱ्या लोकांचा हाताला कामधंदा नव्हते, काही लोकानवर उपासमारीची पाळी आली होती, अशातच आपल्या वडिलांन बरोबर यवतमाळ शहरात व जिल्ह्यात फिरून गरीब गरजू लोकांना अन्नधान्याच्या किटा बनवून वाटणे, गोरगरीब लोकांची रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी राळेगाव तालुक्यातील आंजी,आंजी कोलांम पोड, लोणी, झाडगाव, सराटी, सराटी पोड इत्यादी गावोगावी फिरून होमिओपॅथीच्या
आर्सेनीक अल्बमच्या गोळ्यांचे विनामूल्य वाटप करणे व कोरोना रोगाबद्दल माहिती देणे इत्यादी कार्य आपल्या लहान वयात काश्यपीने आपल्या वडिलांन सोबत पार पडले, हे कार्य करत असताना सराटी इथे लोणी येथील सिहगृपचे सामाजिक कार्यकर्ते पूर्वज गलांडे व गावकरी याच्या हस्ते कोरोना योद्धा म्हणून काश्यपीचा व वडील विनोद दोंदल यांना पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले,
अशा प्रकारच्या समाज उपयेगीकार्या मुळे सर्वत्र समाजात काश्यपीचे कौतुक केला जात आहे .