पोटा चनकापुर येथे आढळला २२ वर्षिय युवक कोरोना पाँजिटीव

 

सुनील उत्तमराव साळवे(९६३७६६१३७८)
कार्यकारी संपादक, दखल न्यूज भारत नागपुर

पोटा-चनकापुर /खापरखेडा: १७ जुलै २०२०
नागपुर जिल्ह्यातील सावनेर विधानसभा क्षेत्रातील पोटा-चनकापुर खापरखेडा येथे आज एक २२ वर्षिय युवक कोरोना पाँजिटीव मिळाला आहे.
प्राप्त माहितीनुसार हा २२ वर्षिय युवक हा AP BAR च्या मागे वार्ड क्रमांक १ पोटा चनकापुर मध्ये राहतो. तसेच हा युवक खापरखेडा वीज केंद्रात कंत्राटी कामगार म्हणून कार्यरत असुन तो रात्रपाळीत कामाला असल्याचे समजते. आज त्याला बरे वाटत नव्हते म्हणून तो सावनेर उपजिल्हा रुग्णालयात तपासणीसाठी गेला असता त्याची रिपोर्ट पाँजिटीव आल्याचे समजते.
पोटा ग्रा पं. च्या सरपंच वंदना ताई ढगे, ग्रा. पं. सदस्य सचिव रहाटे तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र चिचोली च्या वैद्यकीय अधिकारी डॉ. पेटकर मैडम्, आरोग्य कर्मचारी, आशा वर्कर, तसेच खापरखेडा पोलिस स्टेशन चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक काळे हे वार्ड क्रमांक १ मधील कोरोना पाँजिटीव पेशंट च्या घरी पोहोचले असुन हा परिसर सील करणे सुरु आहे. तसेच या परिसरास सेनिट्राईज करण्याची प्रक्रिया सुरु असल्याचे ग्रा पं कर्मचारी प्रविण घोडमारे यांनी सांगितले.

*खापरखेडा वीज प्रकल्पात कोरोना चा शिरकाव?*
पोटा चनकापुर मधील २२ वर्षिय युवक पाँजिटीव निघाला तसेच हा युवक खापरखेडा वीज प्रकल्पात कार्यरत होता. त्यामुळे तो ज्या विभागात कार्यरत आहे त्या परिसरात कोरोना चे संकट उद्भवु शकते. खापरखेडा वीज प्रकल्पाचे मुख्य अभियंता प्रकाश खंडारे यांनी अतितात्काळ या विभागास सेनिट्राईज करण्याची आवश्यकता आहे. तसेच मुख्य प्रवेशद्वारावर येणाऱ्या सर्व अधिकारी, कर्मचारी व कामगार यांची स्क्रिनिंग करण्याची व वैद्यकीय तपासणी करण्याची मागणी होत आहे.