महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटेक्निकचा उत्कृष्ट निकाल

173

 

जगदिश वेन्नम/बिंबिसार शहारे

ब्रम्हपुरी दि.१६/०७/२०२०:
महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण परीक्षा मंडळ मुबंई द्वारा द्वितीय व चतुर्थ सत्र (नियमीत विद्यार्थी) पदविका उन्हाळी परीक्षा २०२० परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला असून यंग इंजिनिअर्स एज्युकेशन कुरखेडा द्वारा संचालित महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटेक्निक, ब्रम्हपुरी चा निकाल १०० टक्के लागला असून दरवर्षी प्रमाणे या वर्षी सुद्धा विदर्भात सर्वोत्कृष्ठ लागलेला आहे. द्वितीय सत्रातील स्थापत्य अभियांत्रिकी शाखेतील कु.हिना भणारे ८३.५ टक्के घेऊन प्रथम स्थानावर, विद्युत अभियांत्रिकी शाखेतील कु.कविता माहुरे ८३.०० टक्के घेऊन द्वितीय स्थानावर तर स्थापत्य अभियांत्रिकी शाखेतील परमानंद मातेरे ८२.५३ टक्के घेऊन तृतीय स्थानावर आहे.चतुर्थ सत्रातील स्थापत्य अभियांत्रिकी शाखेतील कु.निकिता हटवार ८३.२५ टक्के घेऊन प्रथम स्थानावर तर स्वप्नील गेडाम ८१.३८ टक्के गन घेऊन द्वितीय स्थानावर आहे.विद्युत अभियांत्रिकी शाखेतील कु.अंजली लिंगायत ८२.२७ टक्के घेऊन प्रथम स्थानावर तर योगेश बन्सोड ८१.३३ द्वितीय स्थानावर आहे.यंत्र अभियांत्रिकी शाखेतील जागेश्वर चौधरी ७६.०० प्रथम स्थानावर तर कुलदीप झोले ७५.०० टक्के घेऊन द्वितीय स्थानावर आहे.यंग इंजिनिअर एज्युकेशन सोसायटीचे चे अध्यक्ष श्री.देवेंद्रजी पिसे,संस्थेचे प्राचार्य प्रा.सुयोग बाळबुधे,यंत्र अभि.शाखेचे विभाग प्रमुख प्रा.नरेंद्र समर्थ,स्थापत्य अभि.शाखेचे विभाग प्रमुख प्रा.असद शेख,विद्युत अभियांत्रिकी शाखेचे विभाग प्रमुख प्रा.रुपेश ढोरे,विज्ञान व मानवता विभागाच्या विभाग प्रमुख सौ.मालती सहारे तसेच शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी गुणवंत उतीर्ण विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.